संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे सुपुत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे जिल्हाप्रमुख आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे स्वाभिमानी धम्म परिषदेत तर्फे यावर्षी दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला असून शरीराचा पुरस्कार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी हारेगाव तालुका श्रीरामपूर येथे व्यासपीठावर शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर भाऊ वाघमारे, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश राव देठे, जोर्वे येथील आंबेडकर चळवळ येथील जेष्ठ कार्यकर्ते दादू विष्णू यादव, साहेबराव यादव, दिलीपराव यादव, संगमनेर तालुक्यातील आदर्श बौद्धाचार्य गौतम भालेराव, एडवोकेट रमेश बनसोडे, विष्णू हरणामे ,बाळासाहेब मोकळ, प्रदीप आढाव ,रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते बन्सी भाऊ घंगाळे, सुनील संगारे, गोरख श्रीखंडे, दत्ता साळवे, बौद्धाचार्य राजू देठे, बौद्धाचार्य नानासाहेब पंडित, संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाप्रमुख रामदास भालेराव, बौद्धाचार्य रावसाहेब पराड, श्रीरामपूर येथील नगरसेवक प्रकाश ढोकणे, नेवासा येथील जेष्ठ कार्यकर्ते सुनील भाऊ वाघमारे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना तालुकाप्रमुख पप्पू पवार, नेवासा तालुका प्रमुख संजय पवार, राहता तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे, कोपरगाव तालुकाप्रमुख सिद्धार्थ मेहेरखांब, शहर अध्यक्ष सचिन अशोक शिंदे, आधी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुधाकर रोहन हे आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते असून त्यांचे वडील माजी आमदार दादासाहेब तथा पीजेरोम यांनी 16 नोव्हेंबर 1939 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अहमदनगरला आले होते त्यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार विजय रोहम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना हरेगाव येथे नेले होते त्यामुळे तो इतिहास आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ आदर्श व्यक्ती महत्त्व सुधाकर रोहन यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सुधाकर उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा देऊन आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समाजामध्ये रुजविण्यासाठी मोठे योगदान असून त्या योगदानापोटी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . त्यांना पुरस्कार दिल्याने सर्वत्र अभिनंदन होत असून लवकरच संगमनेर येथे स्वाभिमानी धम्म परिषद आयोजन करणार असल्याचे सुधाकर रोहम यांनी म्हणाले असून भीमराव आंबेडकर यांना सदर परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणार असून सबंध महाराष्ट्रातून भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्षाचे व आंबेडकर चळवळीतील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.