रुग्णांच्या सेवेसारखे समाधान कोठेच नाही – डॉ.अभिजित होशिंग

0

नगर – दवाखान्यात येणारे रुग्ण हे विश्‍वासाने डॉक्टरांकडे येत असतात. त्यांच्या आजारावर योग्य उपयार करुन आधार देण्याचे काम प्रथम डॉक्टरांनी करावे. ‘तुम्ही पुर्ण बरे होताल, काही काळजी करण्याचे कारण नाही’ या दोन वाक्यांवर 50 टक्के रुग्ण मनाने बरा होतो तर 50 टक्के डॉक्टरांच्या उपचाराने. रुग्णांची सेवा ही ईश्‍वरीय सेवा मानली तर आपल्या अंर्तमनाला त्यासारखे समाधान कोठेच नाही, असे प्रतिपादन डॉ.अभिजित होशिंग यांनी केले.

     स्नेह 75  ग्रुपच्यावतीने डॉक्टर्स उे निमित्त नगरचे प्रसिद्ध दंततज्ञ डॉ. अभिजित होशिंग,डॉ. सुवर्णा होशिंग यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.प्रविण रानडे, डॉ.विनोद सोळंकी, किशोर रेणाविकर, अजित चाबुकस्वार व सदस्य उपस्थित होते.

     डॉ.अभिजित होशिंग पुढे म्हणाले, माझे वडिल डॉ.अशोक होशिंग यांनी तर केवळ सेवाभावी वृत्तीने दवाखाना सुरु केला होता. त्यांच्याकडे येणारे रुग्ण खूप दु:खी-कष्टी होऊन येत, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर पहिल्यांदा त्यास आधार मग उपचार असे व्रत जोपासत व्यवसाय कमी व सेवाभावी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या ही शिकवण आम्ही पुढे सुरु ठेवली, याचे समाधान वाटते.

     डॉ.होशिंग यांचा मुलगा इशान याने कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळविला, लहान वयातच त्याचे केलेली कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. याबद्दल त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.प्रविण रानडे यांनी केले तर अजित चाबुकस्वार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here