रेशनचा तांदूळ अवैधरित्या साठवल्या प्रकरणी राहुरीत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल ;सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

0

तोतया पोलीस पथकाने व्यापाऱ्याला लावला लाखोंचा चुना ! देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिराजवळ एका घरात अवैधरित्या प्लॅस्टिक गोण्यामध्ये विना परवाना तांदूळ खरेदी विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माञ आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. महसूल पथकाने हा छापा टाकला असून या ठिकाणी पथकाला १ लाख २० हजार रुपये किंमतीचा तांदूळ व ५ हजार ५२५ रुपये किंमतीचा शासकीय बारदाना मिळून आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

              देवळाली प्रवरा येथील आनंद लखीचंद देसरडा हा शहरातील खंडोबा मंदीराजवळ राजळे वस्ती येथे अवैधरित्या प्लॅस्टिकच्या गोण्यामधील तांदूळ विनापरवाना खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला. तसेच त्याच्याकडे शासकीय खाकी बारदना (पोते) ही महसूल पथकाला मिळून आले.

             राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील औटी, पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर, महेश देशमुख, तलाठी दीपक साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या छाप्यात १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या १६६ तांदूळ गोण्या तसेच ५ हजार ५२५ रुपयाचा ३२५ शासकीय गोण्या असा एकूण १ लाख २५ हजार ५२५ रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत राहुरीचे पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आनंद लखीचंद देसरडा याच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहे.

……ते पोलिस पथक तोताया, व्यापाऱ्यास तडजोडीअंती लावला लाखो रुपयांना चुना !

           देवळाली प्रवरा येथिल किराणा व्यापारी आनंद देसर्डा याने राजळे वस्ती येथिल एका खोलित रेशनचा तांदुळ साठवला होता.बुधवारी पहाटे शासकीय गोण्यात भरलेला तांदळाचा ट्रक या ठिकाणी आलेला होता. या ठिकाणी पोलिसांचे पथक आले. त्या व्यापाऱ्यास आम्ही नगर येथिल गुन्हे शाखेचे पथक आहे.असे सांगुन त्या गोडावूनचे दरवाजा तोडून तांदुळाची पहाणी करुन ट्रक मधील तांदुळासह पोलिस स्टेशनला घ्या असे सांगितले.पुरवठा विभागातील एक ठेकेदारव किराणा व्यापारीआणि मालट्रक मालक यांच्या बरोबर लाखो रुपयांची तडजोड केली. याची दिवसभर चर्चा सुरु असताना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क केला.परंतू त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नसल्याने मेसेजद्वारे त्यांच्या कडून देवळाली प्रवरातील छाप्या बाबत माहिती घेतली असता त्यांनी आमच्या कोणत्याही पथकाने छापा टाकला नाही असे सांगितले.राञीच्या अंधारात तोताया पोलिसांनी तांदळाच्या व्यापाऱ्यावर छापा टाकून लाखो रुपयांची तडजोड करुन याच तोतया पोलिसांनी तहसिलदार यांना तांदळाच्या शासकीय गोण्या असलेल्या ट्रक व गोडावूनचे छायचिञ पाठवले असण्याची शक्यता असल्याने ज्या नंबर वरुन छायचिञ आले तो नंबर कोणाचा याची चौकशी पोलिस करीत असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले.

महसुलच्या ‘त्या’ व्यक्ती बाबत चर्चेला उधान

                    बुधवारी पहाटे शासकीय गोण्यात भरलेला तांदुळ आनंद देसर्डा यांच्या गोडावून मध्ये बारदाना बदलून खाली करत असताना पुरवठा विभागातील  तो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याची चर्चा छाप्याच्यावेळी दिवसभर सुरु होती.यामुळे गुरवारी महसुल विभागातील पुरवठा विभागातील ‘तो’ कर्मचारी कोण याची चर्चा होवून प्रत्येक जण ऐकमेकांकडे संशयाच्या सुईने पाहत होता.शासकीय तांदुळ खरेदी विक्री करण्यात पुरवठा विभाच्या त्या कर्मचाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here