रेशिडेन्शिअलचा कृष्ण शिंदे वाणिज्य विभागात प्रथम

0

     नगर – जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाचा इ. 12 वी वाणिज्य विभागाचा विद्यार्थी चि.कृष्णा रामदास शिंदे याने 402 (83.68%) गुण मिळवित विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

     त्यास वर्ग शिक्षक प्रा.रविंद्र देवढे, डॉ.म्हातारदेव म्हस्के,  प्रा.भाऊसाहेब नाडेकर, प्रा.जालिंदर पिंपळे, प्रा.धनंजय लाटे, प्रा.आरती साबळे, प्रा.मनिषा सगळगिळे, प्रा.प्रतिम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त जी.डी.खानदेशे, सहसचिव जयंत वाघ, प्राचार्य विजयकुमार पोकळे, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here