लव जिहादचा धोका टाळण्यासाठी मराठा समाजाने सतर्क रहावे – राजेंद्र कोंढरे 

मराठा समाजाने आता सुधारण्याची गरज असून अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने लग्न करावे

0

संगमनेर :  समाजामध्ये लव जिहादचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असून मराठा समाजातील मुली त्याच्या बळी ठरत असल्याने मराठा समाजाने यासाठी आता जागरूक राहिले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले. संगमनेरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठकीत राजेंद्र कोंढरे बोलत होते.

            या बैठकीला नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वराळ, राहाता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, अजय हासे, साहेबराव दातखिळे आदी यावेळी उपस्थित होते. कोंढरे म्हणाले की अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तरुणांना कर्ज मिळवून देण्याबरोबर व्यावसायिक मार्गदर्शन केले पाहिजे. सारथीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्यातून आयएएस,आयपीएस मराठा अधिकारी निर्माण झाले तर मराठा समाजासाठी मोठे कार्य होईल. या दोन्ही योंजनाचा फायदा आरक्षणामुळे होणार आहे. मराठा समाजाने आता सुधारण्याची गरज असून अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने लग्न करावे, मानपानाच्या  नादी न लागता मुला बाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आपल्या मुलांची लग्न ठरवताना लग्न स्थळासंदर्भात पूर्ण खात्री करावी. खरच तो नोकरीला आहे का ? पगार खरा सांगितला आहे का ? त्यांनी सांगितलेली स्थावर मालमत्ता त्यांचीच आहे का ? या गोष्टी खात्रीशीर तपासल्या तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here