लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा – ॲड. गोरक्ष लोखंडे

0

शिर्डी प्रतिनिधी :-  सफाई कामगारांच्या हक्कासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी केल्या.जिल्ह्यातील शिर्डी, राहूरी, कोपरगाव, राहाता, देवळाली, श्रीरामपूर व अकोले नगरपरिषदेत कार्यरत सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत शिर्डी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद शाखेचे सहायक आयुक्त अभिजित हराळे, राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कोपरगाव सुहास जगताप, श्रीरामपूर मच्छिंद्र घोलप, राहूरी ज्ञानेश्वर ढोंबरे व देवळाली प्रवराचे विकास नेवाळे आदी उपस्थित होते. 

लोखंडे म्हणाले, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व सवलती द्याव्यात, कामगारांना किमान वेतन मिळेल यांची सर्व नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क आदी सुरक्षा साधने तात्काळ पुरविण्यात यावेत.

 शासन सफाई कामगारांच्या जीवनमानात बदल व्हावा, यासाठी शासन नवनवीन योजना आणत आहे. सफाई कामगारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात येत आहे, असे ही लोखंडे यांनी सांगितले.याप्रसंगी लोखंडे यांनी सफाई कामगारांकडून त्यांच्या समस्यास जाणून घेत समाज कल्याण व नगरपरिषद विभागांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here