राहता /कोपरगाव
कोऱ्हाळे सारखे खेडेगाव येथील प्रा. विजय शेटे व संदीप चौधरी यांचे वर्गमित्र प्रकाश मुरलीधर बनसोडे यांची कन्या कु.ऐश्वर्या बनसोडे हीची पुणे येथे रुबी हॉस्पिटलमध्ये नर्स (परिचारिका)म्हणून निवड झाली आहे. तिचे इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतची शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोऱ्हाळे येथे झाले तर इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ७६ टक्के गुण मिळविले होते .
२०१७-१८ मध्ये तिचा विज्ञान शाखेचा प्रवास श्री गणेश शैक्षणिक संकुलामध्ये सुरू झाला… २०१८-१९ मध्ये ती इयत्ता बारावी विज्ञान 72.76गुण घेऊन उत्तीर्ण झाली . २०१९ मध्ये नीट परीक्षेत ३६० गुण मिळवून, श्रीरामपूर येथे St.Looks कॉलेज ऑफ नर्सिंग साठी प्रवेश मिळविला. यानंतर तिने आपल्या अथक परिश्रम आणि अभ्यास करून २०२२ मध्ये नर्सिंग ची पदवी संपादन केली.
ऐश्वर्याचे वडील प्रकाश बनसोडे हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे इयत्ता अकरावी-बारावीचे शिक्षण श्री गणेश शैक्षणिक संकुलात चालू असताना त्यांनी आपल्या पाल्यांचे भविष्य घडविण्यासाठी महाविद्यालयात शिपाई या पदावर नोकरी केली. शिपाई या पदावर कार्यरत असताना त्यांनी अतिशय चौकस पद्धतीने आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे आवर्जून लक्ष दिले…..
प्रकाश बनसोडे यांना मुलांचे शिक्षण करण्यासाठी आर्थिक अडचण असल्याकारणाने श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे व उपाध्यक्ष संदीप चौधरी यांनी ऐश्वर्या हिला दोन्ही वर्ष मोफत शिक्षण आणि इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. बनसोडे यांनी वेळेला पडेल तशी कामे करून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. त्यांची दुसरी मुलगी अस्मिता ही नाशिक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे तर छोटा मुलगा आशिष हा BSc केमिस्ट्रीचे शिक्षण घेत आहे….
अशा बिकट परिस्थितीत ऐश्वर्या व तिच्या दोन्ही भावांना प्रयत्नांची शर्थ करत आपले ध्येय गाठले. ऐश्वर्या हिने आपला पहिला पगार होताच आयुष्यभर सायकलवर फिरणाऱ्या आपल्या बापासाठी नवीन गाडी भेट केली. आपल्या लाडक्या लेकीने आपल्या आयुष्यातील पाहिल्या कमाईतून बापासाठी घेतलेली भेट स्वीकारताना वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नसते तर नवलच …
आयुष्यात झालेली हेळसांड आणि केलेले अपार कष्ट आपली मुले शंभर टक्के कमी करतील असा विश्वास प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केली. प्रकाश बनसोडे यांचे वार्षिक उत्पन्न असलेली रक्कम आपली मुलगी एका महिन्यात कमावते याबद्दल त्यांना प्रचंड कुतूहल आणि तितकाच आनंद आहे.
ऐश्वर्या सध्या रुबी हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे श्री गणेश शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. विजय शेटे यांनी आणि ऐश्वर्याला मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन यांनी तिच्या पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा व तिला यांचे खूप खूप अभिनंदन केले .
प्रकाश बनसोडे यांचा मोबाईल क्रमांक : 77091 57942