चंदीगड : महिला अॅथलिट आणि ज्युनियर कोचने भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत FIR दाखल केली आहे.
चंदीगड पोलिसांनी संदीप सिंह यांच्यावर पाठलाग करणे, लैंगिक शोषण करणे आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली FIR दाखल केला. FIR दाखल झाल्याच्या काही तासांनंतरच संदीप सिंह यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, क्रीडा मंत्रालयाचा प्रभार मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सुपूर्द केलाय.
FIR चंदीडगच्या सेक्टर 26 पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय. मात्र, संदीप सिंह यांनी महिला अॅथलिट आणि कोचनं केलेले आरोप फेटाळले आहेत. संदीप सिंह यांच्याविरोधात IPC च्या कलम 354, 354-ए, 354-बी, 342 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महिला कोचने म्हटलं की, “मला निष्पक्ष तपासाचं आश्वासन देण्यात आलंय. मी माझ्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. मला सोशल मीडियावर धमकावलं जातंय. भीतीनं मी कुणाचेही फोन उचलत नाहीय.”
“क्रीडामंत्री संदीप सिहं यांनी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान ऑफस आणि इतर ठिकाणी लैंगिक शोषण केलं. एकदा त्यांनी मला चंदीगडस्थित सेक्टर सात येथील घरी येण्यास सांगितलं. ते कायम सोशल मीडियावरून माझ्याशी बोलत असत. चंदीगडस्थित घरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला. मी सर्व माहिती चंदीगड पोलिसांना दिलीय.”
तक्रारदार महिला पोलीस मुख्यालयात एकटीच पोहोचली होती. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, “संदीप सिंह यांनी पाठवलेले मेसेज आता माझ्याकडे नाहीत. कारण ते डिसअपियरिंग मोडमध्ये पाठवण्यात आले होते.” “यावेळी संदीप सिंह म्हणाले की, “ज्युनियर कोच (महिला) ची नियुक्त झज्जरमध्ये होती. मात्र, पंचकुलामध्येही त्यांना राहायचं होतं. मी त्यांना क्रीडा विभागात अर्ज करायला सांगितलं होतं आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, खेळाडूंमध्ये अशाप्रकारचं नियोजन करावं, जेणेकरून प्रशिक्षणावर परिणाम होणार नाही. या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी. चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे.”