देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वडनेर परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढवून धड शरीरा वेगळे केल्याने या शेतकऱ्याचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.शेतकऱ्यांला ठार करणारा नरभक्षक बिबट्या २४ तासात वन विभागाने जेरबंद केला.मंगळवारी रात्री आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.पिंजऱ्याच्या बाहेर व शेतात फिरताना दोन बिबटे कँमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की,वडनेर ता.राहुरी येथिल शेतकरी सोमवारी पहाटे शोभाचंद गव्हाणे मकाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले असताना बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.या घटनेमुळे वन विभागाचे प्रशासन खडबडून जागे झाले.
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भुमिका घेत याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. सदर नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी केली होती. वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ कार्यवाही करीत टीम रवाना करून या भागात टॅब कॅमेराही बसविण्यात आला होता. अखेर सोमवारी रात्री १ वाजेच्या दरम्यान नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.तर मंगळवारी रात्री ११ वा.दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.जेरबंद झालेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याच्या बाहेरच्या बाजुला तिसरा बिबट्या कँमेऱ्यात कैद झाला असून चौथा बिबट्या शेतात फिरताना काही शेतकऱ्यांनी पाहिला आहे.वन विभागाने दुसरा बिबट्या डिग्रस नर्सरी येथे हलविला आहे.दोन दिवसात दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.यावरुन गव्हाणे यांच्या शेताजवळ अजुन दोन बिबटे असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
वडनेर येथिल घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. डी सालविठ्ठल व सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनरक्षक , वनपाल असा 30 ते 40 जणांचा ताफा वडनेर येथील गव्हाणे वस्तीसह विविध ठिकाणी पिंजरे लावून तैनात ठेवला होता .
वडनेर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी उपवनसंरक्षक डी. डी. सालविठ्ठल , सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनपाल राजू रायकर, वनपाल लक्ष्मण शेंडगे, वनपाल सचिन शहाणे,वनपाल गणेश गिरी वनरक्षक मदन गाडेकर वनरक्षक समाधान चव्हाण वनरक्षक सागर वाकचौरे वनरक्षक शंकर खेमनर वनरक्षक महेश ससे वनरक्षक रामचंद्र आडागळे, शंकर खेमनर,अंकराज जाधव, पोपट ढोकणे,ताराचंद गायकवाड,राजेंद्र घुगे, आदींचा सहभागी झाले होते.