पिंजरा लावण्यास वनविभाग असमर्थ..
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याने नुसता धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने अनेक मुक्या प्राण्यांचा जीव घेतला. मात्र वन विभागाने सोनेवाडी ग्रामपंचायत वेळोवेळी पत्र देऊनही बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यास असमर्थता दर्शवली आहे . यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रविवारी पहाटे तीन वाजता गोरक्षनाथ मंदिर परिसरात मिंड यांच्या वस्तीवर या बिबट्याने हल्ला चढवत एका शेळीची शिकार केली.पहाटे तीन वाजता हे शेतकरी कुटुंब आपल्या घरात झोपलेले असताना. शेळ्या व गाई बांधण्यासाठी तारीचे कुंपण असताना देखील या बिबट्याने शेवग्याच्या झाडावर चढून कंपाउंडच्या आत मध्ये उडी घेतली. समोर असलेल्या बकरीची शिकार केली मात्र भेदारल्याने कुत्री भुंकु व जनावरे हंबरडा फोडू लागली. बाहेर आवाज आल्यानंतर मिंड वस्तीवरील भिकाजी मिंड, रावसाहेब मिंड गणेश मिंड हे बाहेर आले. आरडाओरडा करत आपल्या जवळील बॅटऱ्या बिबट्याच्या दिशेने चमकवल्या तेव्हा तेथून बिबट्याने धूम ठोकली मात्र शेळीचा जीव त्यांना वाचवता आला नाही.घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील दगू गुडघे यांना दिली असता त्यांनी वनविभागाच्या अधिकारीशी संपर्क साधत घटनास्थळी पंचनाम्यासाठी बोलावून घेतले.वनरक्षक वैभव गिरी यांनी मृत झालेल्या शेळीचा पंचा समवेत पंचनामा केला.
बारा हजार रुपयाची शेळी बिबट्याने फस्त केली याचे दुःख आहे या परिसरात बिबट्याने अनेक गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्राण्यांची शिकार केली आहे. जर वेळीच वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला असता तर अशा घटना घडल्या नसत्या. हा बिबट्या आमच्या परिसरात गेल्या 21 दिवसापासून बाजूच्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेला आहे .. गणेश मिंड शेतकरी
वनविभागाचे सातत्याने या परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी दुर्लक्ष आहे. पोहेगाव परिसरात अपघातात जो बिबट्या मयत झाला. याला कारणीभूत देखील वनविभाग आहे. या बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी कोर्टात जाणार आहे. वनविभागाने त्वरित सोनेवाडी परिसरात पिंजरा लावावा..
पोलीस पाटील दगू गुडघे
परवा भोजडे परिसरात विहिरीतून बिबट्या काढताना पिंजऱ्याचा खालचा भाग तुटलेला आहे. राहाता परिसरातून पिंजरा रिकामा आहे का याची चौकशी करून सोनेवाडी परिसरात पिंजरा लावला जाईल..
प्रतिभा सोनवणे : अधिकारी वनविभाग कोपरगाव