वन विभाग ॲक्शन मोडवर; राखीव वनातील अवैध वाळूसाठे केले उध्वस्त 

0

कोपरगाव प्रतिनिधी -: महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाच्या माध्यमातून घराच्या बांधकामासाठी स्वस्तात वाळु उपलब्ध करुन देण्यासाठी गोदावरी नदी पात्रातुन डेपोसाठी काढण्यात आलेल्या वाळूचा बेकायदेशीर वाळूसाठा सोनारी वनविभागाच्या हद्दीत साठा करण्यात येवुन दोन नंबर मार्गाने परस्पर वाळुची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी कारवाई केल्याने शासकीय वाळू ठेकेदार व वाळू तस्करामध्ये एकच खळबळ उडाली आहे 

कोपरगाव  तालुक्यातील माहेगाव व कुंभारी येथिल गोदावरी नदीपात्रातुन शासनाने बोटीद्वारे वाळु उपशाचे महसुल आयुक्त नाशिक यांच्या हस्ते आँगस्ट २०२३ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. परंतु यावेळी शासकीय वाळू ठेकेदारांना सक्त सूचना करण्यात आल्या होत्या की वन विभागाच्या हद्दीमध्ये वाळू साठा करू नये अथवा राखीव वनातून कोणत्याही प्रकारचा रस्त्याचा मार्ग काढू नये. परंतु सर्व वाळू ठेकेदारांनी महसूलचे व वनविभागाचे कायदे धाब्यावर बसून आपल्या मनमानीपणाने वनविभागाचे हद्दीतील राखीवनामध्ये अवैधरीत्या वाळू साठे करण्यात आले होते. त्यामुळे येथील वृक्षांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. शिवाय वृक्ष बी लोप पावत चालले आहे तरी वनविभागाच्या हद्दीत वाळु साठवणुक झाल्यानंतर तहसीलदार महेश सावंत यांनी सदर ठेकेदारावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असून वनविभागाच्या हद्दीत अवैध वाळू साठे व रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारावर वनविभागाचे अधिकारी काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here