वाईट स्पर्श बाबतीत विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे – न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी 

0

जामखेड न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

जामखेड तालुका प्रतिनिधी – तालुका विधी सेवा समिती जामखेड, रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुकुल प्रकल्प अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन जामखेड न्यायालय परिसरात करण्यात आले. यावेळी श्री नागेश विद्यालय ज्यूनियर कॉलेज व एनसीसी कॅडेट यांनी जामखेड शहरांमध्ये स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन प्राचार्य मडके बी के यांच्या हस्ते झाले. गुरुकुल अंतर्गत पाचवी ते नववी विद्यार्थ्यांसाठी न्यायालय परिसर व कामकाज  क्षेत्र भेट नियोजन करण्यात आले.

     

यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद राऊत, उपाध्यक्ष अॅड. अमीर पठाण, माजी अध्यक्ष अॅड. ए के शेख ,सचिव अॅड. अक्षय वाळुंजकर , प्राचार्य मडके बी के, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, प्रा. विनोद सासवडकर, एनसीसी अधिकारी मयुर भोसले, अॅड. संग्राम पोले, अॅड. शिवाजी लटपटे, अॅड. के. जी. शिरोळे, अॅड. के. डी. गायकवाड, अॅड. पी. जे. थोरात, अॅड.  ढाळे, 

 शेळके पी  व्ही,   सी एस ढेपे, एस. ए. ढगे,  जी. व्ही. माखले, ए. एस. अमीना, ए. एल. चव्हाण,  आर. एम. परजने, संभाजी इंगळे, अशोक सांगळे,सागर फुंडे, एस. आर. रणदिवे, शंकर गुट्टे, ज्योती पालकर, मनीषा शिनगारे, रणजित मोरे, ज्ञानेश्वर शेटे, नरसाळे मॅडम,देशमुख मॅडम, डुबल मॅडम सर्व शिक्षक वकील व न्यायालय स्टाफ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

         जामखेड  तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. ए. के. शेख यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा ,  स्त्रीभ्रुण हत्या व इतर सामाजिक दुष्कृते या विषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थी विद्यार्थ्यांना केले. 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष  न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी सांगितले की चांगला स्पर्श वाईट स्पर्श यासंदर्भात मार्गदर्शन करताना मुला मुलींनी आपल्याबद्दल कोणतीही  चुकीची घटना घडत असेल तर तसेच मुलींनी वाईट स्पर्श संदर्भात माहिती आपल्या पालकांना, शिक्षकांना आवश्यक द्यावी. मनात कोणतेही भीती बाळगू नये.  त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थीनी  सतर्क रहावे. त्यामुळे एखादी चुकिची घटना होण्यास व बालकांचे लैंगीक अत्याचारास आळा बसेल.  लैंगिक अत्याचारा संबंधात कायदे कडक झालेले आहेत मुली संदर्भात तक्रार आल्यास त्याची दखल आम्ही घेणारच. मुलींनी चुकीची घटना घडल्यास त्याची माहिती द्यावी.असे मार्गदर्शन करून नागेश विद्यालयाचे कौतुक केले. 

गुरुकुल अंतर्गत पाचवी ते नववी क्षेत्रभेट उपक्रमांमध्ये न्यायालयाचे सर्वसाधारण कामकाजाची माहिती व  यावेळी न्यायालयीन स्टाफ व वकील  यांनी विद्यार्थ्यांना देऊन प्रत्यक्ष काम काज कसे चालते याविषयी सखोल मार्गदर्शन केले.रयत गुरुकुल ची माहिती संतोष ससाणे यांनी सर्वाना दिली .

      यावेळी जामखेड वकील संघटने नूतन अध्यक्ष अॅड. प्रमोद राऊत, उपाध्यक्ष अॅड. अमीर पठाण, सचिव अॅड. अक्षय वाळुजंकर यांची  निवड झाल्या बद्दल  सन्मान करण्यात आला . अॅड महारुद्र नागरगोजे  व मयुर भोसले  सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संभाजी इंगळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here