वाडिया पार्क येथे 16 ऑक्टोबर रोजी प्रौढांच्या खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन

0

अहमदनगर – जिल्हा क्रीडा संकुल येथील असलेल्या वाडिया पार्क जलतरण तलावा मध्ये सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी प्रौढांच्या खुल्या जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाडिया पार्क जलतरण तलावाचे नव्याने व्यवस्थापन करण्यात आले आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या वाडिया पार्क जलतरण तलावाचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती वाडिया पार्क जलतरण तलावाचे संचालक गणेश कुलकर्णी यांनी दिली.

नगरमध्ये अनेक हौशी व खेळाडू जलपटू आहेत. त्यांच्यामध्ये अधिक उत्साह व आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क जलतरण तलावा येथे विविध स्पर्धा, प्रशिक्षण व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.16 ऑक्टोबर रोजी होणार्‍या खुल्या स्पर्धा या विविध वयोगटातील प्रौढ पुरुषांसाठी होणार आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका वाडिया पार्क जलतरण तलाव येथे उपलब्ध आहेत, अशी कुलकर्णीज् स्विम अँड रिसर्च अकॅडमीच्या संचालिका भूपाली कुलकर्णी यांनी दिली.

     प्रौढांमध्ये जलतरण या खेळाविषयी व पाण्यातील व्यायामा विषयी आवड निर्माण करून त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. खुल्या जलतरण या स्पर्धेला जास्तीत जास्त जलपटूंनी प्रतिसाद देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here