गुलमोहोर रोड श्री स्वामी समर्थ मंदिरात शिंदवड दिंडीचे स्वागत
नगर – आषाढी वारीत पंढरपुरला जाणार्या दिंड्या, वारकरी बघितले तरी डोळे भारावून जातात. अशावेळी आपणही वारकरी व्हावे व पांडूरंगाच्या दर्शनाला जावे, असे वाटते. पण प्रपंच, उद्योग, व्यवसाय, नोकरीत व्यस्त असतो, आणि आपली वारी होत नाही. पण दिंडीतील वारकर्यांच्या सेवेतही खूप मोठे समाधान मनाला मिळते, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ मंदिराचे सुनिल मानकर यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शिंदवड येथील दिंडीचे गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वागत करण्यात आले. रात्रीच्या मुक्कामी असलेल्या या दिंडीतील वारकर्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी सुनिल मानकर, पंकज गुजराथी, विजय तिमोणे, विनोद पोरे, संदिप पाटील, निखिल देवरे, किरण वाकडमाने, संजय देशपांडे, संतोष उपाध्ये, देवीदास गुडा, धनजंय कदम, देवीदास म्हस्के, नितीन भिसे, आदिनाथ म्हस्के, रमाकांत देवचक्के, अर्चना मानकर, कांता दारकुंडे, अरुणा गायकवाड, सुनंदा जोशी, सुभद्रा पाठक, राधा दगडे, वैष्णवी दगडे आदिसह भाविक उपस्थित होते.
श्रीक्षेत्र शिंदवड ते निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारीचे हे 11 वे वर्ष असून, प्रथम वर्षापासून नगरमध्ये पहिला मुक्काम स्वामींच्या मंदिरात असतो. या पालखीचे स्वागत संपूर्ण रस्त्यांवर सडा-रांगोळी काढून, फटाके फोडून करण्यात आले. विणाकरी, तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला, पादुका आदिंचे सर्व परिसरातील महिलांनी पूजन करुनसर्वांचे औक्षण केले. यावेळी सावेडी उपनगरातील लोकांनी पालखी व स्वामी समर्थ दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी भजनी मंडळाने संगीतमय हरिपाठ सादर करुन सर्वांचे मने जिंकली. या भक्तीमय वातावरणामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते.
———–