कोपरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन व मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त या अभियानांतर्गत रविवारी ( दि. 3 डिसेंबर 2023 ) सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा 89 वा. सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभियानात वारीतील कहार गल्ली, जगधने गल्ली, रामेश्वर गल्ली, रामेश्वर महादेव मंदिर, हनुमान मंदिर, जय बाबाजी मंदिर, स्मशानभूमी परिसरात संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या पेटवून दिल्या. तसेच स्मशानभूमीतील गवतावर तणनाशक फवारणी केली
या स्वच्छता अभियानात माजी सरपंच सतीशराव कानडे, स्वच्छतादूत मधुकरराव टेके, सेवानिवृत बँक अधिकारी रावसाहेब जगताप, नवनाथ कवडे, विलास तात्या गाडेकर, वारीचे पोस्ट मास्तर संजय कवाडे, सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र टेके, माहिती अधिकार कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव, पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, विलास जगधने, मनोज जगधने यांच्यासह पुणतांबे येथील बबनराव थोरात यांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.