श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहाने संपन्न
कोपरगाव : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा शालेय व वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ नुकताच उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कमलकिशोर राठी सहाय्यक संचालक(वित्त) शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अविनाश कुलकर्णी अधिक्षक शालेय षोषण आहार जि.प.अहमदनगर हे होते.
प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.सरस्वतीचे पुजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. विदयालयांचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय करुन दीला. विदयालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी अहवालाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खडतर परीश्रमा शिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट करुन ध्येय निश्चित करुन वाटचाल करा म्हणजे यश मिळेल , ही भूमी साईबाबाची असुन त्यांचा श्रध्दा व सबुरीचा मुलमंत्र जीवनात पाळा.ग्रामीण भागातील मुलांनी शहरात शिक्षण घेताना आत्मविश्वाने सामोरे जावे न्युनगंड बाळगू नये असे सुचविले. समाजात आपले स्थान निर्माण करुन परत शाळेत पाहुणे म्हणून या असे सुचवले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना अविनाश कुलकर्णी यांनी मी या शाळेचा माजी विद्यार्थी असुन माझ्या यशामध्ये विदयालयाचा मोठा वाटा आहे असे स्पष्ट केले. चांगले संस्कार देवुन आदर्श विदयार्थी घडविण्याचे चांगले कार्य विदयालयामध्ये होत आहे असे म्हणाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एस.एस.सी.मार्च परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थींना व क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडुंचा पारितोषिक देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ.संगिता मालकर यांना नुकताच राज्य शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला म्हणून शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, डॉ .अमोल अजमेरे,राजेश ठोळे,संदीप अजमेरे,राहुरीचे शालेय षोषण आहार अधिक्षक श्री.साळुंके,प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मिना पाटणी,भागचंद माणिकचंद इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य मकरंद निमोणकर,वनिता मंडळाच्या अध्यक्षा सौ.वंदना चिकटे,के.बी.पी.विदयालयांचे मुख्याध्यापक सुरेश कातकडे, दीलीप तुपसैंदर, स्वप्निल मालपुरे, पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी विदयार्थीनी शानदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.त्यांचे संयोजन सौ.आर.आर.बोरावके,पी.डी.तुपसैंदर,सी.व्ही निंबाळकर यांनी केले.
शालेय व वार्षिक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सौ.एस.ए.अजमेरे,एस.एस.मालपुरे आणि सुरेश गोरे यांनी केले. तर रघुनाथ लकारे यांनी मानले.