विद्यार्थ्यांनी व्यवहाराचे गणित शिकावे: शिवाजीराव कराड  

0
फोटोच्या ओळी : गणित विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण करतांना गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड,स्नेहलताई घाडगे,ह.भ.प.ससे महाराज आदि मान्यवर(छाया:ईस्माइल शेख)

कुकाणा प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच आयुष्यात दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे व्यवहाराचे गणित शिकावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव  कराड  यांनी केले. नेवासा पंचायत समिती व गणितविज्ञान अध्यापक  संघटना ,नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,तालुक्यातील 50वे गणित विज्ञान प्रदर्शन दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील मुकिंदपूर , त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा येथे उत्साहात पार पडले.त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना शिवाजीराव कराड यांनी भविष्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणात नविन क्रांती होऊन संधी उपलब्ध होणार आहेत. परंतु कोरोना काळात आपण वेगळा अनुभव घेतला आहे, त्यामुळे  विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असे गणिती व्यवहार ज्ञान आत्मसात करावे.स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचा उपयोग करून स्वतःची प्रगती करावी ,असा आशावाद व्यक्त केला.                   यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अँड स्नेहलताई घाडगे,ह.भ.प.ससे महाराज जळके, प्राचार्य सोपान काळे,विज्ञान संघटनेचे अध्यक्ष तुकाराम फटांगरे,गणित संघटनेचे  अध्यक्ष संजय काळे,सचिव ईस्माइल शेख, पांडुरंग बरे, खजिनदार अर्जुन शिंदे, दत्तात्रय गवळी,परीक्षा प्रमुख महेश देशमुख, सुरेश काळे, कांबळे जे.एन.,उपाध्यक्ष जयंत पाटील,कावेरी मापारी,रविंद्र गायकवाड,जाधव मेडम,गाडेकर मेडम,विषयतज्ञ समी शेख,उमेश मुंडे, गणेश कचरे,आदिसह सहभागी विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here