देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचा उत्साह पाहायला मिळाला.उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते वृक्षारोपन करुन नवगतांचे स्वागत करण्यात आले.
देवळाली प्रवरा येथिल पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचा उत्साह पाहायला मिळाला.उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.नवगतांचे शाळेतील शिक्षकांनी गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.नवगतांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारा बरोबर गोड-धोड जेवन देण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे,माजी अध्यक्ष सुनिल शेटे,नानासाहेब होले,अमोल भांगरे,केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड,प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख,स्वाती पालवे, सुप्रिया आंबेकर, ऐ.व्ही.तुपे, सुनिता मुरकुटे, व्ही.डी.तनपुरे, भारती पेरणे,लक्ष्मी ऐटाळे, जकीया इनामदार,मिनाश्री तुपे, शिवाजी जाधव, सुभाष अंगारखे आदींसह पालकवर्ग उपस्थित होते.