विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर दंडात्मक कारवाई

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

          राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या वर्षी सन 2023 मध्ये एकूण 112 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या पैकी केवळ बारा गुन्हे उघडकीस आलेले आहेत.त्याच अनुषंगाने राहुरी शहरात बुधवारी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 76 मोटारसायकल स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

                 राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट वाहने चालवली जात आहेत. विना नंबर प्लेट वाहनाकडून अपघात घडल्यानंतर पोलिसात कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर वाहन निघून जात असल्याने अशा वाहनांचा शोध लावण्यात अडचणी येतात. या कारवाईतून चोरीच्या मोटारसायकली कोणी वापरीत आहेत का? हे शोधून काढण्याच्या उद्देशाने व भविष्यात वाहनाकडून अपघात झाल्यास त्या वाहनाचा तात्काळ शोध लावण्याच्या उद्देशाने बुधवारी राहुरी पोलीस स्टेशन एकूण सहा पथके तयार करुन दुचाकी वाहनांची तपासणी मोहिम राबविण्यात आली.

                राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये  2023 मध्ये एकूण 112 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.त्यापैकी बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तालुक्यामध्ये आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट वाहने चालविली जात आहे. विना नंबर

वाहनाकडून अपघात घडून वाहन निघून

गेल्यास त्याचा शोध लावण्यात अडचणी

येतात.तसेच चोरीच्या मोटारसायकल  कोणी वापरात आहेत का? हे शोधून काढण्याच्या उद्देशाने व भविष्यात वाहनाकडून अपघात झाल्यास त्या वाहनाचा तात्काळ शोध लागण्याच्या उद्देशाने राहुरी पोलीसांनी सहा पथकाद्वारे हि कारवाई करण्यात आली. 

          राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक, बारागाव नांदूर चौक,शनिशिंगणापूर फाटा, शनी मंदिर चौक, पाच नंबर नाका, पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. सदर नाकाबंदीत एकूण ७६ वाहने विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेटच्या आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून भविष्यात त्यांच्यावर परत दंडात्मक कारवाई होऊ नये याकरिता त्यांच्याकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेऊन योग्य तो दंड आकारून वाहने सोडण्यात आली.

                नाकाबंदी मध्ये चार मोटारसायकल धारकांकडे वाहनांचे  कागदपत्र उपलब्ध नसल्याने सदर मोटारसायकल बाबत खाञी करुन घेतल्या नंतरच सदरच्या मोटारसायकली चोरीच्या आहे किंवा नाही. त्यानंतर मोटारसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते,सुनील फुलारी, एकनाथ आव्हाड, पो.हे.काँ. सुरज गायकवाड,विकास वैराळ, जानकीराम खेमणर, शकुर् सय्यद, वाल्मीक पारधी,पोलीस नाईक रामनाथ

सानप,बाबासाहेब शेळके, विकास साळवे, जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, गणेश लीपने, आदिनाथ पाखरे, जालिंदर धायगुडे, प्रवीण आहीरे, रवी पवार,अमोल गायकवाड, भाऊसाहेब शिरसाठ,संतोष राठोड,रवी कांबळे, गोवर्धन कदम,अंकुश भोसले, रोहित पालवे आदींनी हि कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here