कोळपेवाडी वार्ताहर :- अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांचा वाढदिवस गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गौतम परिवारातर्फे प्राचार्य नूर शेख यांनी सौ.चैतालीताई काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अशोक होन यांनी सौ.चैतालीताई काळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्याचा आढावा घेतला. कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांना भरीव आर्थिक सहाय्य करून अनेक महिलांना घरबसल्या छोट्या मोठ्या गृहद्योगासाठी सर्वोतोपरीमदत करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून या स्पर्धेत एकूण ६५० विद्यार्थ्यांनि सहभाग घेतला. शाळेच्या ७५० निवासी विद्यार्थ्यांनी आपले खेळाची मैदाने साफ करून श्रमदान केले. यावेळी प्राचार्य यांच्या उपस्थितीत क्रीडासंचालक, प्रशिक्षक, सर्व हाऊस मास्टर्स व निवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. यावेळी प्राचार्य नूर शेख यांच्यासह पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.