कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ यांच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सविता विधाते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांचा मोर्चा काढून गटशिक्षणाधिकारी सौ शबाना शेख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की आजच्या महागाईच्या काळात दरमहा 1500 रुपये इतके मानधन दिले जाते. ते उत्पन्न दारिद्र रेषेपेक्षाही कमी उत्पन्न आहे. ते किमान वेतन प्रमाणे 15,000 रुपये मिळावे.स्वयंपाकी व मदतनीस यांना आरोग्य विमा शासनाच्या वतीने लागू करावा. इतर सर्व विभागाप्रमाणे गणवेश लागू करावा. आहार शिजवीण्यासाठी लागणारे भांडे बदलून मिळावे तसेच मिक्सर व प्रेशर कुकर मिळावे, शालेय पोषण आहार ही योजना कायमस्वरूपी आहे त्यामुळे आहार शिजविणारे स्वयंपाकी व मदतनीस यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सौ. शबाना शेख यांनी मागण्याचे निवेदन त्वरित वरिष्ठ शासकीय पातळीवर पाठवून न्याय मिळण्याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी तालुक्यातील शालेय स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या प्रमाणात हजर होते.