विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय; 12 व्या दिवशीही आंदोलनावर तोडगानाही.

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

         राहरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या 23 वर्षा पासुन पगारवाढ व इतर मागण्यां सातत्याने पाठ पुरावा करुनही संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ व प्रशासकीय मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांवर अन्याय केला जात आहे.आंदोलना दरम्यान प्रशासकीय अधिकारी यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर थाळी नाद करुन मागण्या मान्य करण्यासाठी लक्षवेधले 12 व्या दिवशीहि या आंदोलनावर तोडगा निघाला नाही. सर्व कामगारांनी काम बंद आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.अकरा दिवसापासून चालू असलेली इमर्जन्सी सेवा  बंद करण्यात आली आहे.वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना प्राचार्य यांनी सुट्टी जाहिर केलीआहे. 

           याबाबत कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय, राहुरी फॅक्टरी येथील शिक्षकेतर कर्मचारी असून आम्ही दि. ७ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमच्या मागणी संदर्भात वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन दिलेले होते. पण अधिकाऱ्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर कसलीही कार्यवाही केली शासनाची नाही.सन 2000 साला पासुन पगार वाढविण्याची मागणी करीत आहे.गेल्या 23 वर्षात प्रशासनाने एकदाही पगार वाढ केली नाही.

             यावेळी कामगारांनी काम बंद आंदोलन गेल्या 12 दिवसा पासुन सुरु असुन सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य आश्वासित प्रगती योजना, कोवीड काळातील थकित पगार, कोवीड सेंटरमध्ये कामगारांचे मानधन, कंत्राटी कामगारांना कायम करणे, पगार वाढ आदी मागण्यांसाठी संस्था आवारात काम बंद आंदोलना बरोबार विविध आंदोलने सुरु करण्यात आली आहे.  या आंदोलनात सिद्धु सूर्यवंशी, गोविंद पठारे ,भगवान म्हसे , गजानन वराळे, कैलास कदम, प्रमोद साळुंखे, अमृत कदम, किशोर कोळसे, जेम्स पाळंदे, संतोष दुशिंग, तोडमल सिस्टर, सोनू म्हस्के, गोरख वाळुंज जुंदरे अशपाक सय्यद ,राजेंद्र लांबे, अशोक उगले, दत्तू मोरे, दत्तू चव्हाण, दत्तू हिवाळे, राजेंद्र म्हसे विजय डुकरे, नंदू कदम ,अल्ताफ इनामदार, राजेंद्र साळुंखे, अशोक देवकाते, विठ्ठल देवरे, बाबासाहेब तांबे, विलास काळे,अरुण तौर, दत्तू हिवाळे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

   ………त्या चार महिलांची आंदोलनातून माघार

         नर्सिग होम मधील सर्वच कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी आंदोलन सुरु केले.याआंदोलनाचे वृत्त वृत्तपञात प्रसिद्ध झाले. त्या वृत्तात त्या चार महिलांची नावे आंदोलनात सहभागा बद्दल प्रसिद्ध झाले.त्यानंतर या चार महिलांनी पञकारांवर आगपाखड करुन काम बंद आंदोलनास बायबाय करुन कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला. आम्ही काम बंद आंदोलनातून माघार घेत आहोत असे जाहिर केले तरी कोणत्याही पञकाराने त्याचे वृत्तांकन केले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here