कोपरगाव दि. २१ जानेवारी : अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून तो जगभर गाजत आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले यांनी रामायण मालिकेत रामाची भूमिका वठवणाऱ्या अभिनेत्यासोबत छायाचित्र घेतले होते ते सध्या समाजमाध्यमांसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, पौराणिक ऐतिहासिक मालिका तयार करून त्या प्रेक्षकांना आवडतील असे काम सुप्रसिद्ध दिग्दर्शक रामानंद सागर यांनी छोट्या पडद्याच्या माध्यमातून केले त्यांची रामायण ही मालिका अत्यंत गाजली या मालिकेत राम सीता यांची भूमिका वठवणाऱ्या अभिनेत्यांनाच जनतेने प्रत्यक्ष देवाचा दर्जा देत त्यांची छायाचित्रे अनंत काळासाठी पुजली होती.
विश्वासराव महाले हे एका राष्ट्रीय पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी असताना त्यांना १९८६ मध्ये रामायण मालिकेत रामाचे पात्र करणाऱ्या सुप्रसिद्ध अरुण गोविल यांच्याशी थेट वार्तालाप करण्याचे संधी मिळाली होती. त्यांनी ही आठवण एका छायाचित्राद्वारे जिवंत ठेवली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्यामुळे विश्वासराव महाले यांना थेट रामायण मालिकेतील काम करणाऱ्या सर्व कलाकारांबरोबर थेट संवाद साधता आला., पौराणिक ऐतिहासिक संदर्भ कसे घेतले जातात, छोट्या पडद्यावर याबाबत नेमकेपणाने काय काम केले जाते, प्रत्यक्ष चित्रीकरण केलेले संवाद आपण जेव्हा छोट्या रुपेरी पडद्यावर पाहतो त्यावेळेस कुठले संवाद ठेवले आणि काय नेमकेपणाने त्यात चित्रित केले हे प्रत्यक्ष पाहताना एक वेगळाच थ्रिल निर्माण होत असतो. विश्वासराव महाले यांनी रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांच्याशी बातचीत साधताना त्यांच्याकडून याबाबतची सर्व तयारी कशी होते हे जाणून घेतले होते. आई-वडिलांनी लहान असताना रामाच्या गोष्टी सांगितल्या पण प्रत्यक्ष त्या पात्रासोबत जेव्हा संवाद साधला त्यातून एक वेगळीच अनुभूती जाणवली, आता तर अयोध्येत रामाचे मंदिर साकारत आहे हा गौरवशाली इतिहास आहे असे विश्वासराव महाले म्हणाले. हल्ली समाज माध्यमे अत्यंत प्रगत झाली आहेत., युवापिढी यात तरबेज आहे. अयोध्येत राम मंदिर साकारत असताना रामायण मालिकेतील कलाकारांच्या आठवणी संपूर्ण जगभर पुन्हा उजाळा देत आहेत, त्याचेच विश्वासराव महाले यांचे अरुण गोविल यांच्याबरोबर असलेले छायाचित्र सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.