कोळपेवाडी वार्ताहर – ग्रामस्थांनी विकासाची सूत्रे तुमच्या हातात दिली असून लोकाभिमुख विकासाला प्राधान्य देवून ग्रामस्थांच्या विश्वासाची परतफेड विकास कामातून करा असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना दिला आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जागृत देवस्थान श्री दत्त मंदिर येथे पार पडला यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या विकास कामांना जनतेने कौल देवून २७ पैकी १६ ग्रामपंचायतीचा विकासाची धुरा काळे गटाकडे सोपविली आहे.त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा ओळखून ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास करा.ज्या विकास कामांची आवश्यकता आहे त्या विकास कामांना प्राधान्य द्या.जनतेचे आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील असा विश्वास दिला.
यावेळी ह.भ.प. हाके महाराज,माहेगाव देशमुख सेवा सोसायटीचे चेअरमन संजय काळे,संभाजीराव काळे,माजी उपसभापती अर्जुनराव काळे,बापूसाहेब जाधव,तुकाराम काळे,के.पी.रोकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुमन रोकडे, सदस्य भास्करराव काळे, बाळासाहेब काळे, दिपक पानगव्हाणे, किरण काळे, भास्करराव लांडगे, सौ.रोहिणी जाधव, सौ.कल्पना पानगव्हाणे, सौ.शितल रोकडे, सौ.मीना पवार, सौ.छाया काळे सौ.पुष्पाताई पानगव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ – माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी आ.आशुतोष काळे व मान्यवर.