मुंबई : अदानी कंपनीला वीज वितरणाची परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. आज (4 जानेवारी) वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले होते. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला गेला होता.