जामखेड तालुका प्रतिनिधी – निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आपल्या पुढील पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनाकडे घरातील मुलाप्रमाणे लक्ष दिले पाहिजे असे जामखेड चे तहसिलदार गणेश माळी यांनी सांगीतले
जामखेड तालुक्यातील साकत येथे स्मशानभुमीत वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार गणेश माळी होते तर प्रमुख पाहुणे सह .वनसरंक्षक वनीकर गणेश मिसाळ, गटविकास अधिकारी शुभम जाधव, वनक्षेत्रपाल कर्जत शेळके , ता. कृषी अधिकारी रविंद्र घुले, विकास अधिकारी अशोक शेळके, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, प्रा. मधुकर राळेभात, कृषी सह्यक समाधान सोनवणे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर,प्रमोद मुरुमकर, हनुमंत वराट, राजेंद्र मुरुमकर,महादेव वराट, आदी उपस्थित होते
रामभाऊ मुरूमकर वनविभागातुन निवृत्त झाल्या पासुन दर वर्षी मशानभुमी शाळेत झाडे लावतात व त्यांचे संगोपन वर्षेभर करतात त्यांनीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते तहसीलदार माळी पुढे बोलतांना म्हणाले झाडे लावणे सोपे आहे मात्र संगोपन करणे खुप अवघड आहे. परंतु रामभाऊ मुरूमकर यांच्या मुळे हजारो झाडाचे संगोपन होत आहे. निवृत्ती नंतर दरवर्षी वृक्ष रोपन करून त्यांचे संगोपन करणे ही आमच्या वनविभागाच्या दुष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे सह .वनसरंक्षक गणेश मिसाळ म्हणाले अमोल मुरुमकर, प्रतिक मुरुमकर, दिलीप मुरूमकर, बाळासाहेब सानप हरिभाऊ वराट, विनोद मुरुमकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांनी केले तर सुत्रसंचालन नागेश मुरुमकर यांनी केले व आभार दिनकर मुरुमकर यांनी मानले .