वृक्षारोपण ही काळाची गरज  : सभापती शरद कार्ले 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. झाडांमुळे आपल्याला  ऑक्सिजन मिळतो या बरोबर ती आपल्याला अन्नही पुरवतात अशीच अन्न पुरविण्याऱ्या आंबा, चिंच, नारळ या झाडांची लागवड करण्यात आली असून ती पाण्याअभावी जळून जाऊ नयेत यासाठी ठिबकची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी किमान एक तरी झाडं लाववे असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.

   शरद कार्ले हे सभापती झाल्यापासून बाजार समिती अंतर्गत विविध उपक्रम व शेतकरी हिताची कामे करत आहेत. त्याच अनुषंगाने आज दि. १३ जूलै रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खर्डा येथील उपबाजार समिती आवारात खर्डा येथे आंबा, चिंच, नारळ या लोकांना उपयुक्त असणाऱ्या वृक्षांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक गौतम उतेकर, नंदकुमार गोरे, वैजिनाथ पाटील,  रवि सुरवसे, खर्डा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड,पोलीस हे. कॉ. संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी म्हस्के, बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे कर्मचारी अक्षय भोगे, संतोष अनंते तसेच महेश दिंडोरे, नामदेव गोपाळघरे, व्यापारी आकाश कोरे, महेश बरे, परमेश्वर खोबरे, सौरभ खिंवसरा, मापाडी, शेतकरी शिवाजी गोपाळघरे, बाळासाहेब मिसाळ, नितीन ढाळे, कांतीलाल गोलेकर, अरुण गोलेकर, प्रकाश गोलेकर, संतोष जाधव, सतीश यादव आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here