वैकुंठधामचा प्रश्न सुटल्याने मनुष्य जीवनातील शेवटच्या प्रवासाचा मार्ग सुखकर

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :

                    राहुरी फँक्टरी येथे सर्व धर्मीय वैकुंठधाम साठी अर्धा एकर जमीन दान दिली. तीही 21 वर्षापुर्वी जमिन दान देणारे श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांचा स्नेह नागरी सत्कार तब्बल 21 वर्षांनी करण्याची बुद्धी आयोजकांना दिली. निर्मल कृष्ण वैकुंठधाम असे नामकरण करण्यात आलेल्या वैकुंठधाम मध्ये सत्काराचे नियोजन करण्यात आले. सर्व धर्मीय वैकुंठधाम साठी जमिन मिळाल्याने राहुरी फँक्टरी येथिल वैकुंठधामचा प्रश्न सुटल्याने मनुष्य जीवनातील शेवटच्या प्रवासाचा मार्ग सुखकर झाल्याने नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 

                    समाज्यात दान करणारयाची संख्या कमी नाही. जो तो आपआपल्या परीने दान देत असतो. मात्र वैकुंठधामसाठी राहुरी फँक्टरी येथिल श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांनी स्वतःच्या मालकीची 21 गुंठे जागा दान करुन नव्या पिढी समोर नविन आर्दश ठेवला आहे. राहुरी फॅक्टरी येथिल जुण्या पिढीतील जेष्ठ व्यापारी श्रीकृष्णलाल उर्फ किसन शेठ मेंद्रु याचा स्नेह सत्कार राहुरी फँक्टरी येथिल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा आर्दश पत संस्थेचे चेअरमन विष्णु गिते, आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, आनंद ऋषी पत संस्थेचे संस्थापक  ललित चोरडीया, राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे, व्यापारी कांतीलाल लोंढा , शांतीचौकाचे दिपक त्रिभुवन, प्रदिप गरड, ज्ञानेश्वर वाणी, किशोर थोरात, भास्कर कोळसे, बाबा कणसे,सचिन वाघमारे, रफिक सय्यद, आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी फँक्टरी येथिल  सहकारी साखर कारखाना ऐके काळी वैभवात भर घालणारा.कारखाना बंद पडल्याने व्यावसायिक बाजार पेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र निवासस्थान म्हणून नागरिक येथे राहायला महत्त्व देतात.जशी  लोकसंख्या वाढत गेली तशी राहुरी फॅक्टरी येथे राहणदारांची संख्या वाढत गेली आहे.परंतु या ठिकाणी जवळ पास एक हि वैकुंठधाम नसल्याने येथिल नागरीकांना सुमारे 4 कि.मी.जावुन देवळाली प्रवरा येथिल वैकुंठधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत होते. श्रीकृष्णलाल उर्फ किसन शेठ मेंद्रु यांनी 21 गुंठे जमिन दान स्वरुपात नगर पालिकेकडे हस्तांतरीत केली.तीही 21 वर्षा पुर्वी हि जमिन मिळाल्याने पालिकेने 21 वर्षात या वैकुंठधामचा कायापालट केला आहे.आज हे वैकुंठधाम गार्डन पेक्षा हि अतिशय चांगले दिसत आहे.

                 देवळाली प्रवरा नगर पालिकेत जनतेतुन पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदी कै. बाळासाहेब चव्हाण यांची निवड झाल्या नंतर राहुरी फँक्टरी येथिल नागरिकांनी वैकुंठधाम उभारण्याची मागणी केली.श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांनी मी जमिन दान देतो.पण सरौव धर्मीय वैकुंठधाम तुम्ही उभारले पाहिजे अशी गळ घातली.नगर पालिकेस वैकुंठधामसाठी जागा मिळाली.निधी मिळेल त्या प्रमाणात सुधारणा करण्याचे काम करण्यात आले.तब्बल 21 वर्षांनी या वैकुंठधामचा कायापालट झाला आहे.नगर पालिकेने या वैकुंठधामचे निर्मल कृष्ण वैकृठधाम असे नामकरण करुन फलक लावला आहे. याच वैकुंठधाम मध्ये श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु  यांचा वयाच्या 88 वर्षी येथिल व्यापारी संघटनेने  सत्कार समारंभ आयोजित करुन उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे.श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांना आपले दान सदप्रात्री झाल्याची खात्री झाली.

निर्मल कृष्ण वैकुंठधामसाठी तीस लाख खर्च;निकत

             देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी फँक्टरी येथे निर्मल कृष्ण वैकुंठधाम उभारण्यात आले आहे.हे वैकुंठधाम सर्व धर्मीय आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडक असल्याने येथे दफनविधीचा प्रश्न निर्माण झाला होता. येथिल खोलवर खडक फोडुन माती मुरुम भरुन दफनविधीचा प्रश्न मार्गी लावला आहे.राहुरी फँक्टरी येथिल वैकुंठधामचा प्रश्न मार्गी लागला आहे.या ठिकाणी बांधकाम व पेव्हींग ब्लाँक,वाँल कंपाऊंड व वैकुंठधाम फलक लावण्यात आला झाडे बसविण्यात आल्याने आज रोजी मोठी झाडे झाल्याने या वैकुंठधामचा कायापालट झाला आहे.या वैकुंठधामवर आज पर्यंत अंदाजे 30 लाख खर्च झाला असावा असे देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here