संगमनेर : दाढ खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील वैभव कैलास जोरी यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्यानिमित्त दाढ खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार करताना शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी भारतीय संविधानाची प्रत देत वैभव कैलास जोडी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांच्या भावी कार्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अहमदनगर जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमासाठी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीयुत सोनवणे समवेत मुकुंद महाराज जोरी पत्रकार सुरेश जोरी, काँग्रेसचे युवा नेते किशोर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते .