शहराच्या रस्त्यांसाठी विशेष रस्ता अनुदान योजनेतून ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

0

कोपरगावची धुळगाव ओळख पुसण्यात यश

कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव असे संबोधले जायचे. ही ओळख पुसण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या बहुतांशी मुख्य रस्त्यांचा प्रश्न मागील साडेतीन वर्षात सोडविला असून कोपरगावची धूळगाव ओळख पूसण्यात यश मिळाले असून शहराच्या विविध रस्त्यांना पुन्हा एकदा ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी शेकडो कोटीचा निधी देवून शहरातील रहदारीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अनेक मुख्य रस्त्यांना देखील निधी देवून नागरिकांना रस्त्याच्या येणाऱ्या अडचणी  दूर केल्या आहेत.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी व कोपरगाव शहरातील रस्ते,शहर सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास,शासकीय इमारती यासाठी आजपर्यंत १२ कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे.

कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच या रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना घरापासून मुख्य रस्ता गाठणे त्रासदायक ठरत होते.त्यामुळे मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील विकास होणे गरजेचे होते व नागरिकांनी देखील आ.आशुतोष काळे यांच्याकडे या रस्ते दुरुस्तीचे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी  विशेष रस्ता अनुदान योजनेतून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील या रस्त्याच्या कामांना ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळविली आहे.

यामध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहनीराज नगरचा मुख्य रस्ता डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग ते सिनगर बिल्डिंग ते साई यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रीम सिटी पर्यंत ७०० ते ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,द्वारका नगरी यांची घरासमोरील काका कोयटे यांचे घरासमोरील सुतार लोहार कार्यालयापासून ते शंकर नगर मध्ये लोहार सर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर भागात गवारे नगर भागात अनवर शेख घर ते कटारे घरापर्यंत ३०० ते ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०१ मध्ये समता नगर भागात गायकवाड घर ते पाटोळे घरापर्यंत ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ०३ मध्ये महाजनगरते घर ते आर के इंजीनिअरिंग पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, हिराबाई लाड घर ते शिंदे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०४ मध्ये वडांगळी वस्ती ते शेखर राहणे वस्ती पर्यंत ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ०४ मध्ये जाकीर भाई घर ते अमोल शर्मा घर डीपी रस्ता ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०६ श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय (बँक रोड)पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे, ढमाले ते आरशी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तसेच देवरे घर ते भुसारी घर रस्ता, सघवी घर ते  माळी बोर्डिंग पर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे, टिळक नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारील परिसर सुशोभीकरण करणे, जिओ ऑफिस ते संदीप किराणा पर्यंत रस्त्यास पेविंग ब्लॉक बसविणे,प्रभाग क्रमांक ०८ मध्ये बाळासाहेब संधान घरचे ते पठाण घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,कडोसे घर ते संदीप पगारे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवा निकेतन रोड पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,लक्ष्मी नगर भागातील विविध गल्ल्यांमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणे, इंदिरापथ रोडवरील झवेरी हॉस्पिटल ते डॉ. नरोडे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ११ मध्ये अंबिका मेडिकल ते दत्त मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,प्रभाग क्रमांक १२ मध्ये बबलू दुकळे घरटे जुबेदा आप्पा घर तसेच दीपक घाटे घर ते फौजीया घर ते मिटकर घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तायरा आप्पा घर ते मोहम्मद शेख घर ते शरीफ शेख घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाखले घर ते पंडोरे वस्ती पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल व या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होऊन नागरिकांची अडचण दूर होणार आहे त्यामुळे नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here