कोपरगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत कोपरगाव शहरातील ३.८८ कोटींच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाला गती देवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, रस्ते, व्यापारी संकुल, शहर सुशोभिकरण अशा विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. कोपरगाव शहरातील नागरीकांसाठी पादचारी मार्ग, भूमिगत गटारी आदी सुविधा उपलब्ध होवून नागरीकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील विकास कामांना निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील एकूण नऊ प्रभागातील ३.८८ कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.०२ मध्ये जानकी विश्व रिध्दी सिध्दी नगर प्रमुख रस्ता पेव्हींग ब्लॉक बसविणे, जानकी विश्व म्हसोबा मंदीर पेव्हींग ब्लॉक बसविणे, गंगा माता मंदीर परिसरा पेव्हींग ब्लॉक बसविणे, आढाव वस्ती अंतर्गत उर्वरीत रस्ता करणे, नगर मनमाड रोड ते संतोष आढाव घर रस्ता करणे, आढाव वस्ती पेव्हींग ब्लॉक बसविणे, संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता करणे, नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.०३ मध्ये डोंगरे घर प्रगत मंदिर भूमिगत गटार करणे, प्रगत गणपती मंदिर ते बागुल दुकान भूमिगत गटार करणे प्रगत गणपती मंदिर ते मुंजाबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रगत गणपती मंदिर ते मच्छी मार्केट पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मच्छी मार्केट ते आनंदभवन भूमिगत गटार करणे, कालेमळा साईबाबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.०४ मध्ये महिला महाविदयालय ते बिरोबा मंदिर भूमिगत गटार करणे, औताडे घर ते नवीन शर्मा घर भूमिगत गटार करणे, नवीन शर्मा घर ते गारदानाला भूमिगत गटार करणे, सोळसे घर ते शंकर वाघ घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मैंद घर ते नवनाथ हूसळे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.०५ मध्ये सुर्यकांत कहार घर ते अजय लचुरे घर भूमिगत गटार करणे, बिलाल शेख घर ते धुमाळ सर घर ते डंबीर दुकानपर्यत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रामदास लकारे घर ते विलास भांगरे घर भूमिगत गटार करणे, अंबिका भोजनालय ते सागर भगत घर ते संदीप लचुरे घर भूमिगत गटार करणे, राहुल देवळालीकर घर ते वेसपर्यत भूमिगत गटार करणे, मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकान भूमिगत गटार करणे, दारुंटे घर ते दत्तपार भूमिगत गटार करणे, माळी काकू घर ते रिकू खडांगळे घर भूमिगत गटार करणे, सुनिल बोरा घर ते मनोज अग्रवाल घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र. ०६ मध्ये राऊत घर ते शांती मेडिकल पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बँक रोड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील इमारत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बोरावके घर ते प्रेम सागर स्वीट भूमिगत गटार करणे, कैलास ठोळे घर ते नपा बिल्डींग पेव्हिंग ब्लॉक बसविणे ठकराल घर ते आरोरा घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.०९ मध्ये इंदिरापथ रोड ते वरदविनायक मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, धारणगांव रोड अन्वर भाई घर ते त्रिभूवन घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, लक्ष्मीनगर राहुल कवरे घर ते शाबीर भाई घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, लक्ष्मीनगर वडणे घर ते ठकाजी लासुरे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, श्रध्दानगरी देशपांडे घर ते अक्षय लोहाडे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र. ११ मध्ये शिवा पंडोरे घर ते नाना चहावाले घर भूमिगत गटार करणे, अक्षय आंग्रे घराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राज टी हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राज टी हाऊस ते रशीद शेख वकील पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.१२ मध्ये संतोष वाकळे घर ते रवी चव्हाण घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, संतोषीमाता मंदिर ते संतोष वाकळे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अशोक खांडेकर घर ते जयसिंग मोहारे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, आप्पा जाधव घर ते संगीता परसिया घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, चांदभाई घर ते शमीम भाई घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पोकळे घर ते संतोष कदम घर भूमिगत गटार करणे, पोकळे घर ते संतोष कदम घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अशोक सोनवणे घर ते चंदाबाई साळवे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ज्ञानेश्वर जाधव घर ते बबबाई लोंढे घर भूमिगत गटार करणे, सार्वजनिक शौचालय पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बौध्दविहार पेव्हिंग ब्लॉक बसविणे, परिट समाज सभागृह ते रेशन दुकान भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील उर्वरित प्रभागातील शिल्लक विकास कामांना देखील लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून त्या कामांना देखील लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोपरगाव शहरातील नऊ प्रभागातील ३.८८ कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचे कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.