सोनेवाडी (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहाजापूर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने महिलांचे मोफत रक्तगट तपासनी, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणीचे आयोजन करण्यान आले या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.
आरोग्य सेवक रामेश्वर इंगळे यांनी महिलांच्या आजाराविषयी जन जागृती केली तर आरोग्य सहाय्यक शेख आर. एस. यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेविषयी महिलांना मार्गदर्श केले. उपदेष ग्रामपंचायत अधिकारी महेश काळे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली. व ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक महिले चा सन्मान उपसरपंच शरद वाबळे यांनी केला.

याप्रसंगी गावचे पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे मुख्याधापक श्री. कदम,श्री.शेख, MPW श्री . पवार व गायकवाड ,आशा सेविका सौ.थोरात व पुजा वाबळे, तसेच बचत गट CRPF सौ डुबे यांनी विशेष प्रयत्न केले असून सरपंच सौ मनिषा माळी उपसरपंच शरद वाबळे ग्रा.. पं. सदस्य सौ कोमल वर्पे, सौ योगिता वाबळे ,सौ अनिता शिंदे, सौ. सविता कदम, सौ वर्षा हांडगे,श्री . परसराम

वाबळे, विठ्ठल वाबळे , पांडुरंग वाबळे , सुधाकर शिंदे, महेश काळे व कर्मचारी श्रीपाद दळवी उपस्थित होते.