कोपरगाव प्रतिनिधी : भारतीय सीमेवर कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान कोपरगाव तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहु महाराज संघ यांचे वतीने करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संघाचे माजी अध्यक्ष मनसाराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कडू यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्राध्यापिका सौ वृंदाताई कोराळकर तसेच प्राध्यापक घैसास सर व कोपरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष विजयराव बंब यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली सुरुवातीस शहीद जवान यांच्या वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान करण्यात आला, या नंतर सेवानिवृत्त मेजर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास राजेश्री शाहू महाराज संघाचे अध्यक्ष बाळासाहेब यशवंत कडू ,मुख्य सचिव गोरक्षनाथ शेळके, कार्याध्यक्ष गणपतराव विधाटे, कोषाध्यक्ष व्हि डी राहतेकर, उपाध्यक्ष अरुण उदावंत, श्री वहाडणे पाटील तसेच सन्माननीय सदस्य श्री वाघ ,श्री सुके कर साहेब,श्री सुभाषराव भास्कर साहेब तसेच श्री आरणे साहेब, सौ संगीता ताई मालकर व श्रीमती सोनवणे ताई उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक श्रीकांत बागुल, दीपक राव पाठक, बाळासाहेब कुर्लेकर ,सुभाष जोशी गुरु, उल्हास गवारे, जोरेकर नाना, भंडारी काका, नजन शेठ याप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
महिला प्रतिनिधी म्हणून सौ सुनयना केळकर ताई सौ रत्ना पाठक ताई सौ तपसे ताई,सौ जोशी ताई सौ कडू ताई,सौ शेळके ताई,सौ अर्चनाताई कडू,सौ श्रुती ताई कडू, श्रीमती गायकवाड ताई,श्रीमती देशमुख ताई,याप्रमाणे अनेक महिला मंडळ हजर होते याप्रमाणे कार्यक्रमा ची सांगता होऊन शेवटी संस्थेचे मुख्य सचिव शेळके साहेब यांनी सर्व उपस्थित यांचे आभार मानले, जी पी शेळके यांनी सुत्रसंचलन केले हा उपक्रम केल्याबद्दल कोपरगाव शहरातून व कोपरगाव तालुक्यातून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ कोपरगाव पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे