२६ एप्रिल शाहिद दिनानिमित्त शहीद जवान गणेश भोसले यांना मानवंदना; ७५ मीटर तिरंगा रॅलीने जामखेडकरांनी दिली मानवंदना
जामखेड तालुका प्रतिनिधी :- २६ एप्रिल हा दिवस जामखेड साठी ऐतिहासिक दिवस व महत्त्वाचा आहे. याच दिवशी मागच्या वर्षी जामखेडचे सुपुत्र गणेश भोसले गडचिरोली येथे कर्तव्य बजावत व देश सेवा करत असताना शहीद झाले. त्याचा अनुषंगाने सर्वांनी आदरांजली वाहण्यात आली आहे.शहीद जवानांच्या कुटुंबासाठी सर्व शासन प्रशासन मदतीसाठी आहे, युवकांनी,विद्यार्थी, एनसीसी कॅडेटनी शाहिद गणेश भोसले यांना स्मरणात ठेऊन त्यांची प्रेरणा घेऊन ठेवून जिद्द कष्ट मेहनत करून देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती व्हावे. सातारा-सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक युवक सैन्यामध्ये भरती आहेत तसेच अहमदनगर जिल्ह्यात आपल्या जामखेड तालुक्याचा नंबर लागावा व दरवर्षी जामखेड मधील अनेक युवक सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवे साठी सज्ज रहावे .ही सेवा यामध्ये मरण आलेले वीरमरण आहे. त्या अनुषंगाने युवकांनी सैन्यामध्ये भरती व्हावे असे आवाहन करतो व शहीद गणेश भोसले यांना आदरांजली वाहतो असे मनोगत न्यायाधीश जगताप यांनी केले.
सीआरपीएफ जवान शहीद गणेश कृष्णाजी भोसले गडचिरोली येथे २६ एप्रिल २०२२ रोजी कर्तव्य बजावत असताना ऑन ड्युटी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ जामखेड मध्ये २६ एप्रिल शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहून ७५ मीटर तिरंगा रॅलीने मानवंदना देण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती न्यायाधीश रजनीकांत जगताप, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार भोसेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , वैद्यकीय अधिकारी सुनील बोराडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे, बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, वीर माता शोभा भोसले ,वीरपिता कृष्णाजी भोसले, प्राचार्य डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशील, प्रा मधुकर राळेभात , सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, बजरंग डोके,नगरसेवक दिगंबर चव्हाण,विनायक राऊत,लक्ष्मण ढेपे, अमित गंभीर, पी. टी. गायकवाड, निलेश टेकले, माजी सैनिक मुस्तफा शेख , रावसाहेब जाधव,डॉ काशीद , कॅप्टन गौतम केळकर,अनिल देडे ,मयूर भोसले, युवराज पाटील, हवा सरनोबत,पांडुरंग भोसले, मंगेश आजबे, डॉ कैलास हजारे, मीना राळेभात ,श्रीराम मुरूमकर ,संजय हजारे, निलेश भोसले, रमेश बोलभट, बापू जरे,ज्ञानेश्वर कुलथे,जयसिंग उगले,किशोर गायवळ,सनी सदाफुले,राजेंद्र पवार ,नाना खडगले आजी माजी सैनिक ,जामखेड शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, प्राध्यापक शिक्षक शासकीय निमशासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्रे मनोगतात यांनी सैनिक सीमेवर लढतात म्हणून आपण समाजात शांततापूर्ण वातावरणामध्ये राहतो आपण प्रत्येक क्षणाला सैनिकाचा अभिमान बाळगला पाहिजे कितीही खडतर परिस्थिती असली तरी जवान देशाचे रक्षण शहीद जवान असतील त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे असे मत व्यक्त करून वीर जवानांना आदरणीय व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी राष्ट्रधर्म पाळून राष्ट्रासाठी जगण्याची समाजासाठी जगण्याची शहीद जवान गणेश भोसले यांना स्मरून शपथ घ्यावी स्वातंत्र्य आबादीत राहण्यासाठी सैनिक कार्य करत असतात. नक्षलग्रस्त भागात काही ऑपरेशन करताना अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन सैनिक कार्य करत असतात . जामखेडकरांना अभिमान वाटावा शाळेंना अभिमान वाटावा असे कार्य शहीद जवान गणेश भोसले यांनी केलेले आहे व पोलीस विभागाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो असे मनोगत व्यक्त केले.
गटविकास प्रकाश पोळ यांनी तळपत्या उन्हात कोसळत्या पावसात कडक थंडीत आपले जवान देशाचे रक्षण करीत असतात गडचिरोली नक्षल ग्रस्त भागात दुर्गम भागात आपली सेवा देत असतात . शहीद गणेश भोसले सुपुत्र जामखेडच्या मातीत जन्माला आले याचा अभिमान वाटला पाहिजे, शहीद झालेल्या कुटुंबांना समाजाने अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे शहीद गणेश भोसले यांच्या मुलांना भविष्यात मदत लागल्यास त्याचा पाठपुरावा आम्ही करू असे मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी भोसले घराण्यांनी आपल्या घरातील एक सुपुत्र दिश सेवेसाठी दिलेला आहे ।शाहिद गणेश भोसले यांनी अतिशय खडतर परिस्थिती असलेल्या भागात सेवा दिलेली आहे गडचिरोली भागात जवानांसाठी खडतर परिस्थिती असून त्यामध्ये सेवा असताना गणेश भोसले शहीद झाले त्यांना नगरपरिषदेच्या वतीने आदरांजली वाहतो असे मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी गणेश भोसले हा सर्वांचा लाडका विद्यार्थी होता कॉलेज शिकताना सर्व शिक्षक स्टाफ चा गळ्यातील ताईत होता .
तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला तिरंगा रॅलीचे नियोजन मयूर भोसले यांनी केले. कॅप्टन गौतम केळकर यांनी शहीद गणेश भोसले यांचा जीवनपट सांगितला सूत्रसंचालन अनिल देवरे यांनी केले मानवंदनाच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले.