चांदेकसारे येथे रक्तदान शिबिर संपन्न
कोपरगाव (वार्ताहर) अपघात किंवा अन्य क्रिटिकल प्रसंगामध्ये रुग्णांना रक्ताची गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा त्यांना ते रक्त तातडीने उपलब्ध झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. रक्तदानाचे महत्त्व आता समाजाला पटले असून स्वयंस्फूर्तीने तरुण रक्तदानासाठी पुढे येत आहे. शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्यक्तींनी वर्षातून एकदा रक्तदान केले पाहिजे असे आवाहन काळे कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे यांनी केले.
ते काल चांदेकसारे येथे रक्तदान शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व साईबाबा संस्थान साईनाथ रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच किरण होन, उपसरपंच सचिन होन, पोलीस पाटील मीराताई रोकडे, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण ,आनंदराव चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव होन,सय्यदनूर शेख, रोहिदास होन, प्राध्यापक विठ्ठल होन, भास्कर होन, माजी सरपंच मतीन शेख,वसिम शेख, कल्याण होन ,
रक्तपेढीच्या डॉक्टर श्रीमती पितांबरे, श्री आवळेकर ,श्री लुटे,श्रीमती मानकर, श्रीमती गोसावी ,श्री ढुमणे, श्री रोकडे ,श्री सचिन,सचिन होन, रंणजीत खरात, रवींद्र खरात ,अरुण खरात ,बापू खरात, विजय खरात, सुनील खरात अदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये जवळपास दुपारच्या सत्रात उपस्थित रक्तदात्यांनी आपले रक्त डोनेट केले होते. प्राध्यापक विठ्ठल होन यांनी सांगितले की एखाद्या रुग्णाला रक्ताची अतिशय गरज असते तेव्हा आपण रक्तपेढीच्या माध्यमातून त्या रुग्णांला कोणत्याही प्रकारची वेळ न घालवता ते रक्त दिले पाहिजे.रक्तदान शिबिरामध्ये अनेक वेळा रक्तदाते आपले रक्तदान करतात मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने एखाद्या रुग्णाला गरज असते तेव्हा मात्र त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होते. हे कुठेतरी थांबण्यासाठी आपण प्रयत्न करावे असेही रक्तपेढीच्या संचालकांना त्यांनी सांगितले. शेवटी आभार रणजीत खरात यांनी मानले.