देवळाली प्रवरा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीत फेरबदल
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र उंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी शोभा किरण मोरे याची नियुक्ती करण्यात आली.
देवळाली प्रवरा जि.प. शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष सुनिल ज्ञानेश्वर शेटे यांनी शाळेच्या मुख्याध्यापक मंगल पठारे यांच्या कडून कामकाजात सहकार्य मिळत नाही.कोणताही खर्च करताना विश्वासात घेतले नाही. समिती समोर कोणताही खर्च मांडला नाही.मुख्याध्यापक पठारे यांच्या मनमानी कारभाराला वैतागुन तडकाफडकी राजीनामा दिला.याच बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष नियुक्त करण्याचे शेटे यांनी जाहिर केले.सर्व सदस्यांना अध्यक्षपद घेण्याची विनंती केली.कोणताही अध्यक्षपदासाठी स्वतःहुन पुढे न आल्याने मावळते अध्यक्ष सुनिल शेटे यांनी पञकार राजेंद्र उंडे यांच्या नावाची सुचना मांडली त्यास नानासाहेब भानुदास होले यांनी अनुमोदन दिले.पञकार उंडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शोभा किरण मोरे यांनाच कायम ठेवण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पत्रकार राजेंद्र उंडे हे अध्यक्ष तर. शोभा किरण मोरे यांना सर्वानुमते उपाध्यक्षपदी म्हणून सर्वानुमते निर्णय झाला. तर सचिव मुख्याध्यापक मंगल पठारे, सदस्य सुनिल ज्ञानेश्वर शेटे,रंजना सुनिल कांबळे,नानासाहेब भानुदास होले,अमोल धोंडीराम भांगरे,अश्विनी अनिल निकाळे,योगिता राजेंद्र तरस,प्रमोद काशिनाथ गाढे,विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन सोहम अनिल गायकवाड, वैष्णवी सिकंदर जाधव,शिक्षक प्रतिनिधी जाकिया बाबासाहब इनामदार,शिवाजी भागा जाधव,अर्जुन विठ्ठल तुपे,आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
माझी शालेय समितीवर एक मुखाने निवड करण्यात आली. याचा मला सार्थ अभिमान आहे. शाळेचा सर्वांगीण विकास व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहील.शाळेची पटसंख्या कमी झाल्याने 18 शिक्षका वरुन 14 शिक्षकावर आली आहे.विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे व शिक्षक संख्या वाढविणे. शिक्षकांचे विविध अडचणी सोडविणे.शाळेच्या विधायक कामासाठी व शाळेचे नाव प्रगती पथावर कसे जाईल यासाठी मी कटिबद्ध राहील.
राजेंद्र उंडे, पत्रकार