संजीवनी वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषद
कोपरगांव: बायोटेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आरोग्य, शेती, औषदनिर्माण, वैद्यकिय, अन्न सुरक्षा, अशा अनेक क्षेत्रात उपयोगी आहे. आधुनिक बायोटेक्नॉलॉजी मानवी आयुर्मान वाढविण्यासाठी अत्यत उपयोगी आहे. या तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्र व्यापले असुन आपल्या जीवनमानाशी या तंत्रज्ञानाचा अगदी जवळचा संबंध आहे, म्हणुन शाश्वत विकासासाठी बायेटेक्नॉलॉजी हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन युनिर्व्हसिटी ऑफ बाथ, युनायटेड किंग्डमच्या प्रो व्हाईस चांसलर प्रा. मोम्ना हेजमदी यांनी केले.
संजीवनी आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेजने मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडियाच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या ‘इनोव्हेशनस् इन बायोटेक्नॉलाजी रिसर्च फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटःचॅलेंजेस अँड प्रक्टिसेस’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. मोम्ना हेजमदी बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले. सदर प्रसंगी संपादक सुधिर लंके, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, राजशाही युनिर्व्हसिटी, बांगलादेशच्या प्रा. नीला फरझाना, मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, सावुथ व्हॅली युनिर्व्हसिटी, इजिप्तच्या डॉ. मनल मोस्तफा, अश्वमेध उद्योगाचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य डॉ. एस.बी. दहिकर, इंटरनॅशनल रिलेशनस् विभागाचे डीन डॉ. एम.बी. गवळी, समन्वयक डॉ. सरीता भुतडा, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. हेजमदी पुढे म्हणाल्या की सध्या सर्वत्र स्पर्धाआहेत, परंतु ज्ञानाच्या जोरावर जगाच्या पाठीवर कोठेही जावुन आपण आपले करीअर करू शकतो. लंके यांनी सांगीतले की बायोटेक्नॉलॉजी हे संमिश्र शास्त्र असुन या तंत्रज्ञानाचे महत्व करोना महामरीत अधिक अधोरेखित झाले. संशोधकांनी या काळात अधिक जोमाने कार्य केले. अनेकदा धर्म महत्वाचा की सायन्स महत्वाचे, हे द्वंद्व आहे, याचा उलगडा संशोधकांनी सांगणे गरजेचे आहे. या परीषदेत सहभाग नोंदविणारे विध्यार्थी, पी.एचडी स्कॉलर व प्राद्यापक निश्चितच एका विशिष्ट ध्येय व दृढनिश्चयाकडे जातील, असा आशावाद लंके यांनी व्यक्त केला.
डॉ. देशमुख यांनी या परीषदेच्या निमित्ताने तज्ञांची मांदीयाळी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय तत्रज्ञांच्या माध्यमातुन दोन दिवसाच्या या विचार मंथनातुन एक उत्तम ज्ञानाची मेजवाणी मिळणार आहे. संजीवनीच्या विविध संस्थांच्या उपलब्धींवरून ते म्हणाले की संजीवनीचे व्यवस्थापन खुप काही उपक्रम राबवुन भविष्यात वेगळ्या उंचीवर जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार अनेक उपक्रम राबविण्याची क्षमता संजीवनी मध्ये आहे.
अमित कोल्हे यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापित केलेल्या किर्तीमानांबद्धल सांगुन संजीवनी संस्था जरी ग्रामिण भागात असली, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अद्ययावत ज्ञान विध्यार्थ्यांना देण्यासाठी अनेक परदेशी विद्यापीठे व संस्थांशी समजोता करार केल्याचे सांगीतले. प्राचार्य डॉ. दहिकर यांनी आंतरराष्ट्रीय परीषदेचे महत्व आणि हेतु स्पष्ट करून सर्वांचे स्वागत केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री नितिनदादा कोल्हे म्हणाले की संजीवसृष्टीसह ह वनस्पती, शेतीवर इंत्यादी बाबींवर जेव्हा संकते येतात तेव्हा संकटांवरील पर्याय बायोटेक्नॉलॉजीमधुन मिळते. परीषदेच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या षोध निबंधामधुन सर्वांच्याच ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी परीषदेच्या स्मरणिकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडियाच्या वतीने मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या मान्यवरांना ‘डिस्टींग्युशड् मायक्रोबायोलॉजिस्ट अवार्ड’ या पुरस्कारने सन्माणित करण्यात आले. यात डॉ. प्रफल्ल रणदिवे (मुंबई), डॉ. निलेश शहा (गुजरात), डॉ. अभिजीत कराळे (पुणे) व डॉ. रंजन कुमार भागोबटी (आसाम) यांचा समावेश होता. प्रा रचना नगरकर यांनी सुत्रसंचलन केले तर डॉ. भुतडा यांनी आभार मानले.