अकोले प्रतिनिधी — श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले विद्यालय सुगाव बु या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत ( इंटरमीजिएट परीक्षा )अतिशय चमकदार कामगिरी करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश मिळवले.महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी शालेय स्तरावर अशा प्रकारची चित्रकला परीक्षा आयोजित करण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवत असतात. महात्मा फुले विद्यालयाने यापूर्वी ही या शासकीय रेखाकला परीक्षेत उत्तम कामगिरी बजावली असल्याने विद्यार्थ्यांना त्यातील बारकावे, जादा तासांचे नियोजन ,सराव आदी माध्यमातून सखोल मार्गदर्शन करण्यात येते.
यंदा 2024-25 या शैक्षणिक वर्षात A ग्रेड प्राप्त 1 , 3 विद्यार्थी B ग्रेड , तर 5 विद्यार्थी C ग्रेड मध्ये पात्र झाले असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.या परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रेडनुसार इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेत अधिक गुण मिळत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. संस्थेच्या सर्वच विद्यालयात याबाबत सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत असते व जास्तीत जास्त विद्यार्थी मोठ्या संख्येने या परीक्षेत पात्र होण्यासाठी संस्था पातळीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
विद्यालयातील आदित्य किरण देशमुख याने A ग्रेड , श्रुतिका गणेश देशमुख , वेदिका अरविंद वाकचौरे, समर्थ अरविंद वाकचौरे यांनी B ग्रेड तर अवधूत योगेश कदम , दर्शन राजेंद्र शिंगवान , सिद्धांत लक्ष्मण वाकचौरे ,तनुजा विलास शिंदे यांनी C ग्रेड मिळवत विद्यालयाच्या मानाचे स्थान प्राप्त करुन दिले .या यशाबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर , कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी मुख्याध्यापक,सिताराम पथवे, अतिशय मेहनत घेत सतत मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कला शिक्षक दिनेश चव्हाण तसेच शिक्षक – पालक संघ , व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांचेसह पालक वर्ग यांचेकडून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.