कु.कावेरी खेडकर व कु. आकांक्षा सुर्यवंशी यांचा नगरसेविका वंदनाताई ताठे यांच्या हस्ते सत्कार
नगर – एमपीएससी परिक्षेद्वारे कु.कावेरी खेडकर हीची सहाय्यक विक्रीकर अधिकारी व भुमापकपदी कु.आकांक्षा सुर्यवंशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेविका वंदनाताई ताठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना नगरसेविका वंदना ताठे म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे मेहनत, जिद्द, चिकाटी शिवाय पर्याय नाही. आपण निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, यश हे निश्चित मिळतेच. हे कु.कावेरी व कु. आकांक्षा यांनी दाखवून दिले आहे. आपल्या परिश्रमातून त्यांनी शासकीय सेवेतील परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे. त्यांनी मिळालेल्या पदाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करावे. मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्यांना कोणतेही क्षेत्र अवघड नाही, त्यासाठी त्यांची आवड ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रभागातील मुलींच्या यशाचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे, असे सांगून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.