डॉ.पाउलबुधे विद्यालयाचा क्रीडा स्पर्धेत दबदबा
नगर – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येय-धोरणाबाबत संस्थेचा पुढाकार असतो. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढीबरोबरच सर्वांगिण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. शिक्षक – विद्यार्थी यांच्या परिश्रमामुळे शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्रात विद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे, असे प्रतिपादन सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव रामकिसन देशमुख यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय खो-खो, कुस्ती, धर्नुविद्या स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेत पोहचलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव रामकिसन देशमुख, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्य भरत बिडवे, क्रीडा शिक्षक महेंद्र थिटे, प्रा.आशा गावडे, विनायक सापा आदि उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने प्रयत्न केले जात आहेत. क्रीडा क्षेत्रातील यशाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विभागीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची विशेष तयार करुन घेतली जाईल. व हेच विद्यार्थी विभागीय पातळीवरही यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
प्राचार्य भरत बिडवे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी चांगली कामगिरी करत आहेत. विभागीय स्पर्धेसाठी निवडीचा आम्हास अभिमान आहे.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक महेंद्र थिटे यांनी सांगितले, जिल्हा क्रीडा संकुल वाडियापार्क येथे सुरु असलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खो-खो, कुस्ती, धर्नुविद्या खेळात चमकदार कामगिरी करुन या स्पर्धेत दबदा निर्माण करुन घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेत फायनलमध्ये विजयी होऊन हा संघ विभागीय स्तरावर दाखल झाला आहे. या स्पर्धेत विद्यार्थी चांगली कामगिरी करुन पारितोषिके मिळवतील, अशी तयार केली जाईल, असे सांगितले.
या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, विनित पाउलबुधे, रामभाऊ बुचकूल, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्राचार्य भरत बिडवे व महेंद्र थिटे यांचे मार्गदर्शन लाभले.