शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नी नवी दिल्लीतील संसद भवनासमोर आंदोलन करणार – प्राचार्य सुनिल पंडित

0

हरिद्वार येथील अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीत घोषणा

     नगर – अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा हरिद्वार उत्तराखंड येथे नुकतीच संपन्न झाली. सदर सभेत देशभरातील सर्व राज्यातून राज्याध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री, कोषाध्यक्ष, महिला आघाडी प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत राज्यध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित यांनीही मार्गदर्शन करुन विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी सिंघल राष्ट्रीय महामंत्री शिवानंद शिंदन केरा अखिल भारतीय संघटन मंत्री महेंद्रजी कपूर, का .र तुंगार आदी मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी प्राचार्य सुनिल पंडित म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर शिक्षणामध्ये एक वाक्यता असावी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु करताना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची चर्चा करावी तसेच एक देश एक वाक्यता या तत्वाखाली संपूर्ण देशभर अभ्यासक्रमाची रचना एकच असावी. त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये शिक्षकांचे संघटन एकच असावे. विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्याचे ठरले.

     या सभेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नावर अनुक्रमे संपूर्ण देशभर जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संपूर्ण देशभर सारखी संख्या ठेवून त्वरित भरती करावी. शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरावीत. शिक्षकांना अशैक्षणिक उदाहरणार्थ बीएलओ सारखी कामे देऊ नये. सेवानिवृत्तांची वयोमर्यादा संपूर्ण देशभर एकच असावी. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना देशभर एकच कॅशलेस योजना लागू करावी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये त्वरित व्हावी. यासाठी सदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ठरवल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रासाठी एकूण अर्थव्यवस्थेच्या दहा  टक्के खर्च करण्यात यावा.  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणे एकाच वेळी महागाई भत्ता व  वेतन आयोग लागू करावेत. निवड व  वरीष्ठ वेतन श्रेणीसाठी असणार्‍या अटी शिथिल करून देशातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळावी. या व अन्य मागण्यासाठी देशव्यापी नवी दिल्ली या ठिकाणी संसद भावना बाहेर तीव्रआंदोलन करण्याचे ठरले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित व खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्याचे अध्यक्ष का रं तुंगार यांनी दिली .

     या सभेस  महामंत्री राजकुमार बोनकले व अमोल काटेकर श्री निनाद खेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. संस्कृतीचे जतन पाश्चिमात्य देशातील विघातक गोष्टीना आळा घालने गुरु पौर्णिमा तसेच गुरुवंदना सारखे कार्यक्रम सर्व स्तरावर घेण्याचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here