शितल खपके ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित

0
अहमदनगर : मान्यवरांच्या हस्ते'आदर्श सरपंच' पुरस्कार स्वीकारताना दवणगावच्या सरपंच शितल भाऊसाहेब खपके, मान्यवर व ग्रामस्थ. (छाया : अमर नेहे)

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

                राहुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्ष प्रणित दवणगावच्या कर्तव्यदक्ष सरपंच शितल भाऊसाहेब खपके यांना सरपंच सेवा संघाचा मानाचा ‘आदर्श सरपंच’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून सरपंच खपके यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

          सरपंच सेवा संघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून गाव खेड्यांतील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहे. या संघटनेच्या माध्यमातून आदर्श सरपंच व विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर येथील माऊली सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शितल खपके यांना संघटनेचे संस्थापक बाबासाहेब पावसे व इतर मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

           सरपंच खपके यांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मेजर भाऊसाहेब खपके, ग्रामसेवक पी. एस. पागीरे आदींनी अभिनंदन केले आहे. तर या सोहळ्यासाठी उपसरपंच गोकुळ साळुंके, पोलीस पाटील नंदकिशोर खपके, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भोसले, भरत होन, भाऊसाहेब मोहटे, शिवाजी खपके, व्हा. चेअरमन नानासाहेब पांडागळे, लिपिक अमर नेहे, शिपाई अनिल खपके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here