शिर्डी : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला कोपरगाव व आताचा Shirdi शिर्डी लोकसभा मतदार संघ गेल्या तीन पंचवार्षिक निवडणूकापासून Congress कॉंग्रेस पासून दूर गेला आहे. मात्र आता आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसने या मतदार संघावर दावा करून जनतेच्या कायम संपर्कात असलेला व स्थानिक उमेदवार देऊन या मतदारसंघात परिवर्तन करावे. परंतु स्थानिकांना डावलून पार्सल उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस मधूनच कडाडून विरोध करण्यात येईल असा इशारा अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
आपल्या पत्रकात वाघमारे यांनी पुढे म्हटले आहे की सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे पाहू लागले आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात काँग्रेस पक्षही आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांचे हितसंबंध असल्याकारणाने पार्सल उमेदवारांना मतदार संघात फिरवण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. विविध कार्यक्रम घेणे मतदार संघात चाप्लूसी करणे असा कार्यक्रम काही तथाकथित उमेदवारांचा चालू आहे . मात्र हे पार्सल उमेदवार केवळ परदेशी पक्षासारखे आहेत . त्यांना येथील भौगोलिक , राजकीय परिस्थितीची जान नाही . तसेच मतदार संघातल्या प्रश्नाची माहीत नाही. मतदारसंघात दहा वर्ष हेच झाले मुंबईच्या पार्सलने येऊन दहा वर्ष मतदारसंघावर राज्य केले पण मतदारसंघातले प्रश्न सोडवायला असफल ठरले आहे. त्यामुळे मतदार संघातील जनता या पार्सल उमेदवारांना वैतागली आहे. म्हणून ह्या वेळेस काँग्रेसने सुद्धा कायम जनतेच्या संपर्कात असलेला उमेदवार देऊन या मतदारसंघात परिवर्तन करावे. जर पार्सल उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्यास तर काँग्रेस मधूनच कडाडून विरोध केला जाईल असे वाघमारे यांनी म्हटले आहे.
स्थानिक व्यक्तीस उमेदवारीच्या मागणी साठी आपण लवकरच पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहोत. आघाडीच्या काळातही या मतदारसंघांमध्ये बाहेरील उमेदवाराला संधी देऊन निवडून आणण्याचे काम झालं. मतदार संघातील स्थानिक पुढाऱ्यांना बाहेर येणारा उमेदवार सोईस्कर वाटतो म्हणून स्थानिक उमेदवाराला उमेदवारी मिळवून न देता बाहेरील उमेदवारास निवडून देण्याचे काम करतात . या गोष्टी काँग्रेसमध्ये घडू नाही यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. यावेळेस स्थानिक उमेदवार सक्षम असून त्यांचाच पक्षाने विचार करावा अशी रास्त मागणी मतदारसंघातून होत आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात योग्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.