संगमनेर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, या पदाधिकारी निवडीत संगमनेरचे मुजीब शेख आणि कोपरगावचे प्रमोद लबडे यांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लागली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनियुक्त निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी रावसाहेब खेवरे, शिर्डी लोकसभा जिल्हा संघटकपदी आप्पाशेठ केसेकर, जिल्हाप्रमुखपदी प्रमोद लबडे (कोपरगाव,श्रीरामपूर, नेवासा) मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता (शिर्डी)) उपजिल्हाप्रमुखपदी महेश नवले (संगमनेर,अकोले) शेखर दुभैय्या (श्रीरामपूर शहर) देविदास सोनवणे (श्रीरामपूर ग्रामीण)तालुकाप्रमुखपदी शिवाजी ठाकरे (कोपरगाव तालुका) सचिन कोते (राहाता तालुका) भाऊसाहेब हासे (संगमनेर तालुका) संजय फड (संगमनेर पठार भाग) राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर तालुका पश्चिम) दादा कोकणे (श्रीरामपूर तालुका पूर्व) मनोज मोरे (अकोले तालुका पूर्व) संतोष मुर्तडक (अकोले तालुका पश्चिम) विधानसभा संघटकपदी असलम शेख (कोपरगाव विधानसभा) शहर प्रमुखपदी सनी वाघ (कोपरगाव शहर) संजय शिंदे (शिर्डी शहर) भागवत लांडगे (राहाता शहर) नितीन नाईकवाडी (अकोले शहर) अमर कतारी (संगमनेर शहर) अतुल शेटे (श्रीरामपूर शहर) समन्वयक कलविंदर दडियाल (कोपरगाव शहर) शहर संघटक गणेश होले (राहाता शहर) आदी पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.