आदिती हुले राज्य गुणवत्ता यादीत १५ व्या स्थानी
कोपरगांव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या ४८ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदिती हुले ही राज्य गुणवत्ता यादीत १५ वी आली. आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल हे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरले असून ‘आत्मा मालिक पॅटर्न’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची ही फलश्रुती आहे अशी प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, सागर अहिरे, रमेश कालेकर, रविंद्र देठे, पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, नितीन अनाप, सुनिल पाटील विषय शिक्षक राहुल जाधव, अनिता वाणी, किशोर बडाख, शिवम तिवारी, पंकज गुरसळ, नितीन अनाप, वनिता लोंढे, पांडुरंग वायखिंडे, ज्ञानेश्वर म्हस्के, अजय कांबळे, रविंद्र धावडे, मनोहर वैद्य, रुपाली होन, प्रियंका चौधरी, दिपक चौधरी, दिपाली भोसले, राजश्री चाळक, प्रशांत कर्पे, मिना सातव, वैशाली गोरे, दत्तात्रय भुसारी, रोहिणी कचरे, जितेंद्र खोत, संदिप शिंदे, वैशाली तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.