कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली- सदिच्छा मंडळाचा उपक्रम
पोहेगांव (प्रतिनिधी) :
कोपरगाव के. बी. पी. विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ-कोपरगाव व गुरुमाऊली- सदिच्छा मंडळ- कोपरगाव आयोजित ‘गुणवंत गौरव सोहळ्यात’ तालुक्यातील NMMS परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेतील 62 शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा, 7 नवनिर्वाचित मुख्याध्यापक तसेच आंतरजिल्हा बदलीने तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र शहा कारवाडीचे प्रमुख संतोष जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब कोपरगावचे अध्यक्ष मनोज कडू होते. मनोज कडू यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद शाळेला आवश्यक असलेली मदत करण्याचे आश्वासन दिले आणि संघाने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात संतोष भाऊ यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालून तरुण पिढीने वाटचाल करून सुसंस्कृत नागरिक बनावे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना जीवघेणी स्पर्धेपासून परावृत्त करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास विद्युलता आढाव, मनोहर शिंदे, रमेश दरेकर, श्रीराम तांबे, विलास गवळी, मनोज सोनवणे, महेंद्र विधाते, सिताराम गव्हाणे, प्रमोद जगताप, प्रदीप भाकरे, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, धनराज जाधव, महेंद्र हरकल, सुरेश जोंधळे, देवराम खेमनर, निवृत्ती बढे, सुरेश बर्वे, नामदेव सोनवणे, महेंद्र निकम, सुनिल टोरपे, नारायण कवडे, संतोष थोरात, राहुल भागवत, संतोष गांगुर्डे, समीर शेख, अण्णासाहेब गुंजाळ, सुरेश नळे, लक्ष्मण पंडोरे, अशोक शिरसाठ, अमोद माळी, चंद्रविलास गव्हाणे, पितांबर पाटील, रविंद्र गोसावी, गंगाराम मेंगाळ, रियाज शेख, राहुल घोडे, तुकाराम भांडकोळी, भाऊसाहेब आढाव, बापू हजारे, दत्तात्रय काळे, ज्ञानदेव मंचरे, सीमा सोनी, चंदनताई ढुमणे, कांता देवकर, प्रतिभा महामुनी, सुनिता गायकवाड, जयश्री गवळी, वृषाली खांदवे, जाधव ताई, अर्चना शहाणे, आदी शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाच्या सर्व शिलेदार यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष किरण निंबाळकर, सूत्रसंचालन प्रतिभा राऊत तर आभार प्रदर्शन गुरुमाऊली- सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर निकुंभ यांनी केले.