शेतकऱ्यांनी आ.रोहित पवारांची गाडी अडवताच वाकी खर्डा रस्त्याला २५ लाखाचा निधी केला मंजूर !

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड तालुक्यातील खर्डा येतील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि. अध्यक्ष सुनील लोंढे, संभाजी भोसले, तात्या ढेरे, उदव ढेरे, राम ढेरे, दत्ता भोसले, रामभाऊ मुळे व इतर तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी  कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांना खर्डा  सोनेगाव – चौकात अचानक पणे त्यांची गाडी अडवून शेतकऱ्यांनी वाकी रस्ता बाबत प्रश्न विचारले असता आ. पवार यांना या गोष्टी ची कायच कल्पना नव्हती. यावेळी आ. पवार म्हणाले की माझेच काय कार्यकर्ते व शेतकरी यांनी एका रस्ता चा विषय घेऊन आले होते. मी कार्यकर्तेना दोन तीन दिवसापुर्वा सांगितले होते. मी निधी टाकलेला आहे तरी पण मधीच व अचानक पणे एक वेगळा पध्दतीने छोटासा प्रेमाच आंदोलन करण्याच प्रयत्न केला. मी त्यांना प्रेमाने सांगितले की अशा पध्दतीने तुम्ही प्रेम दाखवत असाल तरी मी तुम्हाला थोड्या वेळाने आपण बसवून चर्चा करू. जो निधी आपण टाकला तो निधी तुम्हाला दाखवतो यवढच येथे झाले. अशा पध्दतीने चुकीचे व्हिडिओ जे कोणी  टाकत असतील किंवा कोण राजकारण करत असतील त्या कडे कोणी लक्ष देऊ नये असे आ. रोहित पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले .

बैठकीत खर्डा येथे खेळीमेळीच्या वातावरणात शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबत आमदार रोहित पवारांनी केली चर्चा खर्डा वाकी रस्त्याच्या कामासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी केला मंजूर

याबाबत माहिती अशी की खर्डा ते जुना वाकी रस्त्याच्या प्रश्न गेली २५ ते ३० वर्षापासून प्रलंबित आहे या भागातील शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याचा व दळणवळणाचा प्रश्न अनेक वेळा यापूर्वीच्या आमदार, खासदार यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते परंतु सर्वांनी या रस्त्यावर शाश्वत असा निधी उपलब्ध केला नाही नंतर या रस्त्याच्या प्रश्नासाठी या भागातील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांचे यापूर्वी ही निवेदन दिले होते, आमदार पवार यांनी समक्ष या रस्त्याला भेट दिली होती त्यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते, परंतु अद्याप पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी दि. १९ मे रोजी खर्डा येथे आ. रोहित पवार हे सोनेगाव रस्त्याने आले असता त्यांच्या गाडीसमोर शेतकरी बसल्याने व ते लोक त्यांच्या जवळ येऊन चर्चा न केल्याने त्यांना अचानक काय प्रकार आहे हे समजले नाही, ते शेतकऱ्यांशी चर्चां न करता निघून गेले,त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते, याचा राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी सोशल मीडियावर बदनामी पोस्ट टाकून शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करून राजकीय आरोप केले गेले,नंतर आमदार रोहित पवारांनी पुन्हा खर्डा येथे येऊन सदर सर्व शेतकऱ्यांबरोबर सविस्तर खेळी मेळीच्या वातावरणात चर्चा करून खर्डा – वाकी  रस्त्यासाठी २५लाख रुपये जिल्हा नियोजन मधून मंजूर करून पुढील रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी येथील शेतकऱ्यांना दिले तसेच तुम्ही माझेच कार्यकर्ते आहेत, तुमचा माझ्यावर कामाच्या संदर्भात अधिकार आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी  कोणतीच नाराजी नाही आपले प्रलंबित असणारे काम करणे हे माझे कर्तव्यच आहे असे सांगितले, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

यावेळी खर्डा सेवा स्वतः सोसायटीचे चेअरमन मुकुंद अप्पा गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन उद्धव ढेरे, विजयसिंह गोलेकर,दत्तात्रय भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य एजाज दादा जिकरे, भाऊ ढेरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर इत्यादी सह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

                चौकट

गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे आमदार व सध्याचे शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे भाजपचे आ. राम शिंदे व शिंदे हे पाच वर्षे मंत्री असताना त्यांनी खर्डा वाकी रस्त्याला मंजुरी दिली नाही, त्यांनाही अनेक वेळा शेतकऱ्यांनी निविदेन दिली होती. परुंतू हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांनी खर्डा येथे येऊन गारपिटीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या आदेश दिले त्यांचाही एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही, विरोधकांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, परंतु खर्डा – वाकी रस्त्याच्या प्रश्नावर  राजकारण करून राजकीय पोळी भाजू नये.

        सुनील लोंढे

जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here