मकाचे 100 क्विंटल पर्यंत उत्पन्न शक्य तर कांदा २०० क्विंटल पर्यंत
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील डॉ चिंतामणी देवकर यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घेतला असून स्वतः निर्माण केलेल्या सभागृहात दर आठवड्याला शेतीविषयक परिसंवाद आयोजित करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.मका पिकाचे एकरी 100 क्विंटल उत्पादन कसे मिळू शकते या विषयी परिसंवाद आयोजित केला होता.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ बाळकृष्ण जडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना एकरी 100 क्विंटल मका उत्पादन येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
या नंतर शेतकरी बांधवांनी विचारलेल्या प्रशनांना शस्त्योक्त पद्धतीने उत्तरे दिली.यावेळी डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे, संचिन कोल्हे, प्रकाश सांगळे,राजेंद्र मांढरे, किशोर शिंदे, सुहास वाबळे,शिवाजी गायकवाड, चेतन देवकर,बाळासाहेब देवकर,विजयराव जाधव अदी सह शेतकरी उपस्थित होते.यावेळी देवकर यांनी ११ तारखेच्या कांदा परिसंवाद कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. एकरी 200 क्विंटल पर्यंत कांद्याचे उत्पन्न मिळू शकते या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे.