( संतप्त भाविकांपुढे नमले पालखी चालक व पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मध्यस्थीने पालखी बालमटाकळीत )
शेवगाव _ जयप्रकाश बागडे,
श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत मार्गक्रमण असून बालमटाकळी येथे पालखीला पायघड्या टाकून ढोल ताशांच्या व टाळ मृदंगाच्या गजरात सबंध गावातून पालखी मिरवून भाविकांनी नाथांच्या पादुकांचे मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेऊन नाथ पालखीचे चालक गोसावी महाराजांचे स्वागत केले , आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच पताका , वारकऱ्यांच्या हातातील भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकाराम व भानुदास एकनाथ महाराजांचा गजर करीत वैष्णवांचा मेळा हा आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरकोस दर मुक्काम करीत पंढरपूरला दिशेने निघालेला आहे , श्री क्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा शेवगाव तालुक्याच्या मुंगी , हातगाव ,बोधेगाव , बालमटाकळी बाडगव्हाण , लाड जळगाव , शेकटे खुर्द मार्गे कुंडलपारगाव जिल्हा बीड अशा मार्गाने मार्गक्रमण केले आहे , श्री क्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा पालखी मार्ग अनेक वर्षापासून धीम्या गतीने होत असलेल्या कामामुळे रखडलेला आहे त्यामुळे वारकऱ्यांना पंढरीला जाण्यासाठी अनेक खस्ता खावा लागत आहे , त्यातच शांती ब्रह्म एकनाथ महाराज पालखीचे चालक व नाथांचे वंशज रघुनाथ बुवा गोसावी यांनी नवीन पायंडा पाडला होता की पालखी ही फक्त पैठण ते पंढरपूर पालखी मार्गानेच जाणार , शेकडो वर्षापूर्वी पासूनची परंपरा असून देखील पालखी पालखी मार्गाने जाणार असा निर्णय घेतल्याने भाविक संतप्त झाल्याने भाविकांना तहसीलदार व पोलीस स्टेशनचा आश्रय घेऊन पालखी आपल्या गावात दर्शनासाठी कशी येईल यासाठी प्रयत्न केले होते , बालमटाकळीत शेकडो वर्षापासून नाथांची पालखी येत असताना देखील पालखी चालकांनी येण्यास टाळले होते परंतु पालखी हातगाव मुक्कामास असताना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व भाविकांसह शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मध्यस्थीने बालमटाकळीत पालखी येणार असल्याचे पालखी चालक गोसावी यांनी कबूल केले अन्यथा बोधगाव येथील लाडजळगाव फाट्यावर हजारो संतप्त भाविक पालखी अडवणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शेवगाव पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा अनर्थ टळला ,
चौकट _ श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर हा 752 पालखी मार्ग असून रस्त्याची कामे गेल्या चार ते पाच वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने चालू आहे , नाथ महाराजांची पालखी ही पालखी मार्गावरून बोधेगाव मार्गे बालमटाकळी व बाडगव्हाण मार्गे लाडजळगाव पुन्हा पालखी मार्गावरून जात असते परंतु बालमटाकळी ते बाडगव्हाण हा देखील पालखीचा मार्ग असल्याने आणि या रस्त्यावर 752 क्रमांकाचा बोर्ड देखील लावलेला असून या पालखी मार्गाचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली आहे , )