तीन शाळेचें वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सोनेवाडी ( वार्ताहर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उद्देश असतो. अभ्यासाचा ताण तणाव कमी करण्यासाठीच असे कार्यक्रम शिक्षण विभागाकडून राबवले जातात.इतर वेळी पालक आपापल्या कामात व्यस्त असतात मात्र आपल्या पाल्यांचे कला गुण पाहण्यासाठी ते आवर्जून यासाठी उपस्थित राहतात. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सोनेवाडी व नगदवाडीचे नागरिक जागृत असून अजूनही समाजामध्ये काही ठराविक वर्ग शिक्षणापासून दूर आहे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी युवकांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फटांगरे वस्ती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायपत्रे वस्ती या तीन शाळेचे एकत्रित स्नेहसंमेलन काल उत्साहात पार पडले.यावेळी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, सरपंच शकुंतला गुडघे, शिक्षणाधिकारी शबाना शेख, शिवाजी जावळे ,बाबासाहेब फटांगरे, निरंजन गुडघे, संदिप गुडघे, केशवराव जावळे, प्रमोद पासलकर ,विजय फटांगरे , केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले , केंद्र प्रमुख विद्याताई भोईर, श्रीमती किरण गायकवाड , सुभाष गरुड, शिक्षक बँकेचे संचालक श्री जेजुरकर,श्री गवळी ,श्री खंदिझोड , मनराज खरे, हेमराज जावळे, श्री गायकवाड, श्री साबळे, श्रीमती शेळके, श्री कुळधरण, श्री कोळगे, चिलूभाऊ जावळे, आबासाहेब जावळे, गणेश राऊत ,राहुल राऊत, बबलू जावळे अदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजेश परजणे यांनी सांगितले की कोपरगाव तालुक्यातील शिक्षण विभागाचे काम चांगले असून येथील शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा टिकवण्यासाठी आपापल्या परीने काम करतात. सध्या प्रत्येक ठिकाणी शिक्षकांची कमी आहे मात्र ती कमी येत्या काही दिवसात भरुण निघेल असे त्यांनी सांगितले. तर गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी सांगितले की जिल्हा परिषदे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पूर्ण प्राधान्य दिले असून मराठी माध्यमातील मुले कुठेच मागे नाही असे त्यांनी सांगितले. या तीनही शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गाणे एकांकिका नाटक चुटकुले व विनोद सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमराज जावळे यांनी केले तर आभार बाबासाहेब फटांगरे यांनी मानले.